strike  Sakal media
मुंबई

मेस्मा बदल्यात आम्हाला जेलमध्ये टाका; कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

पालघर : महाराष्ट्र वीज महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी (MSEB Employee) पालघरमध्येही केंद्र व राज्य सरकारच्या (central and state government) विद्युत औद्योगिक खासगीकरण कायदा रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आजपासून काम बंद आंदोलनाला (strike) सुरुवात केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.

मेस्मा लावून आमची गळचेपी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे; मात्र आम्ही मागण्यांवर ठाम आहोत. मेस्मापेक्षा आम्हाला तुरुंगांमध्येच टाका, पण खासगीकरण आम्ही करू देणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिला. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला.

वीज कंपन्यांचे खासगीकरण थांबवा, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे आम्ही विद्युत ग्राहकाला वेठीस धरणार नाही. सध्या परीक्षा सुरू असल्यामुळे पुरवठा बंद पडल्यास आम्ही सहकार्य करणार आहोत.
- लक्ष्मण राठोड, अध्यक्ष, संघर्ष समिती, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT