we are still waiting for MIM says Prakash Ambedkar 
मुंबई

काँग्रेसशी आता चर्चा बंद; 'एमआयएम'ची अखेरपर्यंत वाट पाहणार : आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ''लोकसभेत काँग्रेस बरोबर युती व्हावी म्हणून प्रयत्न केले असता ते आम्हाला खेळवत राहिले, युती त्यांनी टाळली. आम्ही स्वतंत्र लढून ताकत दाखवली. आमची आता काँग्रेस सोबत बैठक झाली आणि व्यक्तिगतही बैठक झाली, आम्ही त्यांना प्रस्ताव दिला. पण त्याचे उत्तर अजून आलेले नाही. आमची काँग्रेस सोबत जाण्याची इच्छा नाही,'' असे सांगत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसशी चर्चेची दारे बंद केली आहे. मात्र, एमआयएमशी अखेरच्या फाॅर्मपर्यंत चर्चा सुरुच राहिल, असेही त्यांनी सांगितले आहे.

आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "आमचा या विधासभेत फूट बॉल होऊ नये म्हणून आम्ही युती करणार नाही. आम्ही आता उमेदवारांची यादी जाहीर करू. वेळ कमी आहे. 27 ऑक्टोबरला दिवाळी आहे असं आम्ही मानतो. आम्हाला प्रचाराला वेळ हवा आहे. एमआयएम बरोबर आमची युती आहे. ओवेसींकडून मला जी माहिती आली आहे, त्या नुसार आमचे शेवटच्या फॉर्म पर्यंत आमचे प्रयत्न सुरू असतील. आम्ही एकत्र आहोत. आम्ही इतर कोणी काही बोलत असतील त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही अध्यक्षांकडे सगळे ठरवतो,"

''आमच्या यादीत थोडे बदल होणार आहेत. एमआयएम बरोबर बोलताना असलेल्या अडचणींवर बोलणार नाही. माझी ओवेसींबरोबर  पुण्यात भेट झाली. डिप्लोमसी चा भाग आहे म्हणून मी म्हणतो की एमआयएम बरोबर शेवटच्या क्षणापर्यंत बोलणी करत राहणार. आम्ही कायम एकत्र आहोत,'' असेही आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : नितेश राणे मुंब्रामध्ये दाखल

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT