mumbai high court sakal
मुंबई

High Court प्रत्येक लहान कंत्राटावर आम्ही लक्ष ठेऊ शकत नाही; याचिकाकर्त्यांना फटकारले

कंपनीला बेकायदेशीर निविदा जारी करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल|A Public Interest Litigation was filed in the High Court after receiving information that illegal tenders had been issued to the company

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: कंत्राटाची कामे देताना त्यात भ्रष्टाचार आणि पक्षपातीपणा होत असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. प्रत्येक लहान कंत्राटावर आम्ही लक्ष ठेऊ शकत नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने सदर याचिका निकाली काढली.(highcourt News)

कुळगाव बदलापूर नगर परिषद मधील कामाचे कंत्राट संबंधितांना देताना त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा दावा करत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मिनाक्षी डोईफोडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

संबंधित नगर परिषदेच्या हद्दीतील आपण सदस्य नसलो तरी एका कंपनीला बेकायदेशीर निविदा जारी करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या.आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली तेव्हा न्यायालयाने म्हटले की, याचिकेचा वैयक्तिक कारणासाठी उपयोग होऊ लागला आहे. तुम्ही एखाद्याला टार्गेट करत आहात.

कथित अनियमितते बद्दल तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे का, त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली का? या निविदा २०२२ मध्ये काढण्यात आल्या तेव्हा तुम्ही का नाही आलात, आतापर्यंत काय करत होतात? असे प्रश्न विचारत न्यायालयाने याचिकाकर्त्याना सुनावले इतकेच नव्हे तर संबंधित यंत्रणेकडे दाद मागा असे स्पष्ट करत खंडपीठाने याचिका निकाली काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर रघुवीर खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; ''मागच्या ५३ वर्षांमध्ये केलेला संघर्ष...''

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

SCROLL FOR NEXT