मुंबई

'ईशान्य भारताच्या सुरक्षेबाबत दक्ष राहण्याची गरज' - ब्रिगेडिअर हेमंत महाजन

कृष्ण जोशी - सकाळ वृत्तसेवा


मुंबई : ईशान्य भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. तसेच, हा प्रदेश चीन, म्यानमार, नेपाळ, भूतान, बांग्लादेश यांना लागून असल्याने तेथील सुरक्षेबाबत अत्यंत दक्ष राहण्याची गरज आहे, असे निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी येथे सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्यावतीने आयोजित ‘ईशान्य भारतात सुरक्षेची आव्हानं’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलता होते. 

ईशान्य भारतात बोडो, उल्फा, नक्षलवादी, माओवादी तसेच अन्य बंडखोर आणि दहशतवादी संघटनांचा उपद्रव अधिक असला तरी भारतीय जवान त्यांच्यावर कारवाई करत आहेत. त्याची चर्चा प्रसारमाध्यमात होत नसल्यामुळे नागरिकांना त्या कारवाईची माहिती मिळत नाही. या बंडखोर संघटना जवळपास संपत आल्या असून त्याचे श्रेय लष्कराच्या कारवाईला जाते. बंडखोरांना देशातील काही विचारवंत सहकार्य करत असले तर त्यांनादेखील वेळीच रोखले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. म्यानमार आणि नेपाळमधून येथे अंमली पदार्थ, बनावट नोटा यांची तस्करी होते. स्मगलिंगच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला मोठा हादरा देण्याचा उद्देश असतो. हेदेखील थेट नसले तरी छुपे युद्ध आहे, त्या आव्हानांनादेखील आपण तोंड दिले पाहिजे, असेही महाजन म्हणाले.

-------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT