Mahavikas-Aghadi-Lockdown 
मुंबई

मुंबई: व्यापारी संघटनांचा राग अनावर; ठाकरे सरकारला दिला इशारा

मुंबई: व्यापारी संघटनांचा राग अनावर; ठाकरे सरकारला दिला इशारा मुंबईत कोरोना रूग्णसंख्या कमी असूनही लॉकडाउन मात्र सुरूच We Will Boycott Mahavikas Aghadi in Upcoming Elections Warning Given by Trade Unions

कृष्णा जोशी

मुंबईत कोरोना रूग्णसंख्या कमी असूनही लॉकडाउन मात्र सुरूच

मुंबई: बिगर अत्यावश्यक दुकानांच्या विचित्र वेळांमुळे व्यापाऱ्यांनी पंचवीस टक्के दुकाने बंद ठेवली आहेत. तर विकेंडला दुकाने बंद आणि लोकांची पर्यटनस्थळांवर गर्दी अशी स्थिती आहे. मुंबईची रुग्णसंख्या कमी झाली असूनही दुकानांवरील निर्बंध न उठवल्यास येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर बहिष्कार टाकू, असा इशारा मुंबईतील दुकानदार संघटनेने दिला आहे. (We Will Boycott Mahavikas Aghadi in Upcoming Elections Warning Given by Trade Unions)

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी पत्रकाद्वारे हा इशारा दिला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या गेले पाच आठवडे लक्षणीयरित्या खाली आली आहे. त्यानुसार मुंबईला पहिल्या किंवा दुसऱ्या श्रेणीत टाकले पाहिजे. तरीही मुंबईला तिसऱ्या श्रेणीत ठेवले जात आहे, त्यामुळे दुकानांवर विनाकारण निर्बंध लादले गेले आहेत. अशा स्थितीत मुंबईतील रोजची रुग्णसंख्या दोनशेच्या खाली येण्याचा अट्टाहास सोडून दुकानांवरील निर्बंध उठवावेत, असेही फेडरेशनचे म्हणणे आहे.

मुंबईला पहिल्या-दुसऱ्या श्रेणीत आणले तर बहुसंख्य दुकाने-व्यवसाय सुरु होतील व शहरवासियांना दिलासा मिळेल. अत्यावश्यक दुकाने दिवसभर सुरु असल्याने तेथे गर्दी नसते. पण बिगर अत्यावश्यक दुकाने संध्याकाळी चार वाजेपर्यंतच खुली असल्याने, संध्याकाळनंतर शॉपिंगला जायची सवय असलेले नागरीक तेथे जातच नाहीत. विकेंडला ग्राहक येऊ शकतात, पण तेव्हा बिगर अत्यावश्यक दुकाने बंदच असतात. अशा स्थितीत दुकानांचा खर्च परवडत नसल्याने अनेकांनी दुकाने बंदच ठेवली आहेत. गेले साडेतीन महिने हीच परिस्थिती असल्याने सरकारने आता मुंबई व लगतच्या शहरांमधील निर्बंध उठवावेत, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.

एकतर दुकानदारांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. मुंबईतील रोजची रुग्णसंख्या दोनशेच्या खाली जाण्याची सरकार वाट पहात आहे, मात्र मुंबईत देशविदेशातून रोज लाखो लोक येत असल्याने ते सहजशक्य नाही. त्यातच लसीकरणाचा दरही खूपच कमी आहे. मात्र याकारणाने मुंबईला महिनोन महिने निर्बंधात जखडून ठेऊ नये. अन्यथा उत्पन्न बुडालेले व्यापारी लौकरच तीव्र आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे उर्वरित देशाप्रमाणे मुंबई-महाराष्ट्रातील निर्बंध उठवावेत, असेही आवाहन फेडरेशनने केले आहे.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT