aditya thackeray 
मुंबई

"आरे'ला हात लावू देणार नाही !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेचा मेट्रो प्रकल्पाला नव्हे; तर आरे वसाहतीत कारशेड बांधण्यास विरोध आहे, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 10) स्पष्ट केले. मेट्रो कारशेडसाठी तेथील झाडे तोडण्यास ठाम विरोध असून, शिवसेना आरेला हात लावू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाने आरे वसाहत परिसरात कारशेड उभारण्याचे ठरवले आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी आरे वसाहतीमधील वृक्ष तोडण्यास शिवसेनेचा ठाम विरोध असल्याचे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. आरे वसाहत परिसरात आढळणाऱ्या वन्यजीवांची छायाचित्रे व व्हिडीओ दाखवून त्यांनी तज्ज्ञांच्या मदतीने सादरीकरण केले. मुंबई मेट्रो रेल महामंडळ दादागिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्यावरणाबाबत निर्णय घ्यायला ते पर्यावरण मंत्रालय आहे का, असा सवालही त्यांनी केला. 

आरे परिसरात मेट्रो कारशेड उभारल्यास मुंबईतील एकमेव हरित पट्टा नष्ट होईल; जैववैविध्य नष्ट होईल. याचा कुणी विचार करणार आहे की नाही, अशी विचारणा आदित्य यांनी केली. मेट्रो महामंडळाच्या संचालक अश्‍विनी भिडे कारशेडसाठी अन्य जागेचा पर्याय नसल्याचे सांगून मुंबईकर आणि न्यायालयाची दिशाभूल करत आहेत. इतर ठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्यास नकार देणाऱ्या अश्‍विनी भिडे यांची बदली करा, अशी मागणीही त्यांनी केली. 

बॅकबे, ओशिवऱ्याचे पर्याय 
"आरे' परिसर हा मुंबईचा प्राणवायू आहे. या भागाला "फॉरेस्ट' म्हणून घोषित करावे. आमची भूमिका फक्त 2700 झाडांबद्दल नाही; जैववैविध्याबाबत आहे. लोकांचा आवाज सरकारने, मेट्रो प्राधिकरणाने ऐकावा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मेट्रो कारशेडची पर्यायी जागा सुचवण्यासाठी आम्ही सल्लागार नाही. सरकारने नेमलेले सल्लागार पर्याय सुचवू शकत नसतील, तर त्यांना बदला, असे सांगताना त्यांनी बॅकबे, ओशिवरा डेपो हे पर्याय सांगितले. 

महापालिका आयुक्तांना अभय? 
आदित्य ठाकरे यांनी अश्‍विनी भिडे यांच्यावर खापर फोडताना शिवसेनेची सत्ता असणाऱ्या महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांचा उल्लेखही केला नाही. वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष असलेल्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आरे वसाहतीमधील 2700 झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मेट्रो कारशेड आरे वसाहतीतच होणे आवश्‍यक असल्याचे ते बैठकांमध्ये वारंवार सांगतात. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे परदेशी यांना अभय का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT