मुंबई

Mumbai: सीट बेल्ट नसल्यास होणार कडक कारवाई; पोलिसांकडून सूचना जाहीर

याबाबतचं निवेदन मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील रस्त्यांवर आता चार चाकी वाहनांमधून प्रवास करताना चालकासह सहप्रवाशांनी सीट बेल्ट न लावता प्रवास केल्यास त्यांच्यावर आता कडक कारवाई होणार आहे. याबाबतचं निवेदन मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं आहे.

निवदेनात मुंबई पोलिसांनी म्हटलं की, मोटर कार चालवणाऱ्या सर्व ड्रायव्हर्सना आणि प्रवाशांना सीटबेल्ट वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मोटर व्हेईकल सुधारणा कायदा, २०१९ च्या १९४ ब (१) नुसार, चालकांना आणि प्रवाशी विना सीटबेल्ट शिक्षेत पात्र होऊ शकतात. ज्या वाहनांमध्ये प्रवाशांसाठी सीटबेल्टची सुविधा नाही त्यांनी १ नोव्हेंबरपर्यंत हे सीटबेल्ट बसवून घ्यावेत.

सायरस मिस्त्रींचा झाला होता सीट बेल्ट न लावल्यानं अपघाती मृत्यू

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारला महिन्याभरापूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातावेळी मिस्त्री यांनी सीट बेल्ट न लावल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. तपासात ही बाब निष्पन्न झाली होती. यापार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यापुढं भारतीय वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज आणि चालकासह सर्व प्रवाशांना सीटबेल्ट लावणं बंधनकारक असल्याची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : नागपूरमधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रकल्पाला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ६ मोठे निर्णय, वाचा...

Mumbai Local News: यंदा रेल्वे रुळावर पाणी साचणार नाही, महापालिकेचा मोठा प्लॅन तयार; नेमकी योजना काय?

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची वेळ बदलली, 'या' वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला, कोण घेणार निरोप?

Latest Marathi News Live Update : मिरा-भाईंदरमधील वाढत्या पाणीटंचाईमुळे मनसेचे अनोखे आंदोलन

YouTube Growth Tips: यूट्यूबवर सबस्क्राईबर्स वाढवून महिन्याला लाखो कसे कमवायचे? कंपनीने स्वतःच सांगितली भन्नाट ट्रिक

SCROLL FOR NEXT