weather update mumbai Water cut every Tuesday in Kalyan Dombivli monsoon esakal
मुंबई

Mumbai Water Supply : कल्याण डोंबिवलीत दर मंगळवारी पाणीकपात

देशातील मान्सून पर्जन्यावर दक्षिण पॅसिफिक महासागरातील अॅलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - देशातील मान्सून पर्जन्यावर दक्षिण पॅसिफिक महासागरातील अॅलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आले. मान्सून लांबण्याचे संकेत मिळत असल्याने धरणातील पाणीसाठा जपून वापरावा अशा सूचना लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्यांपर्यत धरणातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी केडीएमसी हद्दीत दर मंगळवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसीफिक महासागरातील अॅलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रकियेमुळे देशातील मान्सुन पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामानानुसार साधारण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्यास सुरवात होते. त्यामुळे15 जुलै पर्यंत धरणातील पाणी साठा पुरेल अशा पद्धतीने लघु पाटबंधारे विभागाकडून पाणी पुरवठा वितरणाचे नियोजन करण्यात येते.

बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्यानंतर जुलै पर्यंत पुरेल इतका पुरेसा पाणीसाठा असल्याने नागरिकांना पाणी कपातचा सामना करावा लागला नव्हता. मात्र यावर्षी मान्सून पर्जन्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून मान्सून लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धरणातील उपलब्ध पाणी साठा 31 ऑगस्ट पर्यंत पुरविणे करिता 32 टक्के तूट येत आहे.

सदरची तुट भरुन काढणेकरीता ठाणे लघु पाटबंधारे विभागाने दिलेल्या निर्देशानुसार उल्हासनदीतील पाणी नियोजनासाठी 9 मे पासून आठवडयातील दर मंगळवारी 24 तास (सोमवारी रात्री 12 ते मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत) पर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण पूर्व व पश्चिम, कल्याण ग्रामिण (शहाड, वडवली, आंबिवली व टिटवाळा), डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Government Directors : अखेर 'त्या' अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; गोकुळवर पाच शासकीय संचालक नियुक्तीचा मार्ग मोकळा, मतदानाचाही मिळाला अधिकार

IND vs NZ 2nd ODI Live : वेलिंग्टन वन डे सामन्याला विलंब का होतोय? मॅच सुरू व्हायची वेळ झाली, पण अजून टॉसही झालेला नाही; जाणून घ्या अपडेट्स

Gokul Chairman Election Controversy : 'जय-पराजय होतात, पण माझ्या मुलाबद्दल जे केलं त्याबद्दल फार खंत वाटते, ते जिव्हारी लागलंय'; हसन मुश्रीफांनी व्यक्त केलं दु:ख

Daily Horoscope : राशिभविष्य - शनिवारी ७ नोव्हेंबर २०२६

Mohammed Shami retirement from Tests: "आज, जड अंतःकरणाने..."; मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; म्हणाला, चांगल्या-वाईट काळात माझ्यावर...

SCROLL FOR NEXT