लॉकडाऊनमुळे विणकामगार उपाशी; उत्सवच बंद असल्याने दोऱ्या विकणार कुणाला?  
मुंबई

कोरोनामुळे विणकामगारांचा जगण्याचा संघर्ष सुरूच; उत्सव बंद असल्याने व्यवसायावर परिणाम!

नीलेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

घाटकोपर : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनचा परिणाम विणकाम करणाऱ्या कामगारांवरही झाला आहे. अर्थार्जनाचे सर्वच मार्ग बंद झाल्याने मुलाबाळांचे उदर भरण कसे करावे, या विवंचनेत घरातील कर्तापुरुष पडला आहे. त्यामुळे अशा स्थितीत सरकार आपल्याला काहीतरी मदत करेल, या अपेक्षेवर ते येणारा दिवस ढकलत आहेत. 

कोरोनामुळे सण-उत्सवासह छोट्या-मोठ्या व्यवसायांवरही मोठा परिणाम झाला आहे. घरकाम व लहानसहान व्यवसाय करणाऱ्यांची तर उपासमार सुरू आहे. भटक्‍या जमातीवरही लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे. भटक्‍या समाजातील विणकाम करणाऱ्यांची सध्याची अवस्था खूपच बिकट बनली आहे. त्यांचा दोऱ्या विणणे हाच मुख्य व्यवसाय आहे. काही लोक कानातील मळ साफ करणे, घरोघरी जाऊन वस्तू विकणे आदी व्यवसाय करतात. कोरोनामुळे त्यांचे खूपच हाल सुरू आहेत. चार महिने घरातच बसून असल्याने दोन वेळच्या जेवणाचीही अडचण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दोऱ्या विणण्याचा व्यवसाय असल्याने शहरात त्यांना "रशीवाला समाज' म्हणून ओळखले जाते. दर वर्षी दहीहंडी, गणेशोत्सवासाठी दोन महिने आधीच या कामाला हे लोक सुरुवात करतात; मात्र यंदा कच्चामाल खरेदीच करता न आल्याने व दहीहंडी उत्सवही रद्द झाल्याने त्यांचा रोजगार हिरावला आहे, अशी प्रतिक्रिया उमेश पवार यांनी दिली. 

रशीवाला समाजाकडून विणलेला माल खरेदी करून व्यापारी जादा भावाने तो माल विक्रीसाठी नेतात. दहीहंडीसाठी लागणाऱ्या एका शिक्‍क्‍याची किंमत बाजारात 50 रुपये आहे. व्यापाऱ्यांना आम्ही 250 ते 300 रुपये डझन भावात विकतो. मुंबईत मोठ-मोठ्या दहीहंडी असणाऱ्या परिसरात आम्ही या रशी विकतो; मात्र लॉकडाऊनमध्ये कुठे जाता येत नाही. रशीची विक्री होत नसल्याने आमची उपासमार सुरू आहे. 
- उमेश पवार, कामगार 

-------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मुंबईत थरार! ४५ मजली भव्य इमारतीत भीषण आग, काही मिनिटांत खळबळ! व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन संदेशावर बीएनपीच्या निवडणूक समन्वय समितीचे प्रमुख नझरुल इस्लाम खान यांची प्रतिक्रिया

Jalna News : सरकारी डेटावर डल्ला! आधार, पॅन, गॅस कार्ड, वाहन डिटेल्ससह ई-चालनाची माहिती लिंक; सहा हजार बनावट वेबसाईट सक्रिय

Kolhapur Lake : जुन्या शहराभोवती, व्यवस्था शेतीसाठी; शेतीला पाणी देण्याची पद्धती अनेक शतकाच्या आधीपासूनच अस्तित्वात

Chhatrapati Sambhajinagar News : शिरसाटांचा इगो काही जाईना, म्हणे ‘जंजाळ मुख्यमंत्री होवो’!

SCROLL FOR NEXT