Mumbai Local Esakal
मुंबई

Mumbai News : लग्नसराई, त्यात उन्हाळी सुट्टी! मेगाब्लॉकमुळे मुंबईकर बेहाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे रविवारी प्रचंड हाल झाले आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर, पनवेल - वाशी अप- डाऊन मार्गावर आणि जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गावर १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. त्यामुळे लग्नसराई आणि उन्हाळी सुट्टीला गावी जाण्यासाठी खरेदीला बाहेर पडलेल्या नागरिकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

उन्हाळी सुट्यांमुळे गावी जाणारे नागरिक,सुट्यांमुळे दक्षिण मुंबईत येणारे पर्यटक आणि लग्नसराईमुळे खरेदी करिता जाणाऱ्या नागरिकांची रविवारी मोठी गैरसोय झाली आहे. मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात आली होती.यामुळे जलद मार्गावरील वाहतुक धिम्या मार्गावरुन चालविण्यात आली. परिणामी या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या.

त्यामुळे लोकलला गर्दी झाली होती.त्यातच रविवार वेळापत्रकामुळे लोकलची संख्या कमी असल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखीनच भर पडली.पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेने १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री १२ ते रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत असल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या होत्या. मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा वांद्रे स्थानकापर्यंत चालविण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

प्रवाशांना दुहेरी त्रास

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप- डाऊन मार्गावर सकाळी ११ ते संध्याकाळी ४. ०५ वाजेपर्यत मेगाब्लॉक घेतला होता. या ब्लॉककालावधीत लोकल सेवा पुर्णपणे बंद होती. त्यामुळे हार्बर मार्गावरुन सीएसएमटीला जाणार्‍या प्रवाशांचे हाल झाले. सानपाडा ते पनवेल दरम्यानच्या नागरिकांना वाशी स्थानकात येण्यासाठी रस्ते मार्गाचा वापर करावा लागला. वाढलेल्या उकाड्यात गर्दीतून प्रवास करताना प्रवासी हैराण झाले आहे. यामुळे प्रवाशांना दुहेरी त्रास सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचं वेळापत्रक कोलमडणार! २६० लोकलफेऱ्या रद्द होणार, कुठे-कसा ब्लॉक? जाणून घ्या

Vaibhav Suryavanshi : कर्णधार म्हणून पदार्पणात वैभव अपयशी; दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर गांगरला अन्...

Pooja More–Dhananjay Jadhav: पूजा मोरे अन् धनंजय जाधवांच्या लग्नात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

Movie Review: माय मराठीचा प्रभावी जागर; 'क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम'

Akola Crime News : दुसऱ्याशी सबंध असल्याचा संशय, तरुणाने समलैंगिक मित्राची केली हत्या; ३ वर्षांपासून होते एकत्र, अकोल्यात खळबळ

SCROLL FOR NEXT