श्रीवर्धन समुद्रकिनार्!यावर नववर्षासाठी पर्यटक मोठ्या संख्‍येने येत असतात. 
मुंबई

नववर्षासाठी श्रीवर्धन सज्ज

सकाळ वृत्तसेवा

श्रीवर्धन (बातमीदार) ः नववर्षाच्या स्वागतासाठी व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी श्रीवर्धन तालुका सज्ज झाला असून, पोलिसांचीही किनारी भागावर करडी नजर राहणार आहे. सध्या श्रीवर्धनमध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. तालुक्‍यातील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर, शेखाडी तसेच दिघी येथील स्थळे पर्यटकांनी फुलून गेली आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, पुणे व अन्य मोठमोठ्या शहरांतून पर्यटक जिल्ह्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये. ग्रामस्थांबरोबरच पर्यटकांनाही नववर्षाचे स्वागत उत्साहात करता यावे. यासाठी श्रीवर्धनमधील पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धनमधील प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांची गस्त चालू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक किनाऱ्यावर तपासणी नाके तयार केले आहेत. श्रीवर्धनमधील प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्याच्या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. तालुक्‍यातील प्रत्येक चौपाटीवर पोलिस वाहने सतत फेरी मारत आहे.

अतिउत्साहींना घडणार अद्दल
नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांनी नववर्षाचा आनंद व्यक्त करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कायद्याचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही व तसे काही झाले तर त्या अतिउत्साही पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

पर्यटक जिल्ह्यातील विविध भागांत येत असतात. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्‍यातील स्थानिकांचा उदरनिर्वाह पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. स्थानिकांनी पर्यटकांना उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा; जेणेकरून श्रीवर्धनमध्ये पर्यटन व्यवसायात भर पडेल. नववर्षाचा जल्लोष करताना सर्वांनी खबरदारी घ्यावी. कायदा-सुव्यवस्था राखावी.
- बापूराव पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी, श्रीवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT