मुंबई

शाब्बास! या अदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच... अनोख्या पद्धतीने साजरा केला स्वातंत्र्य दिन

संदीप पंडित


विरार - देशाला स्वातंत्र मिळून ७४ वर्ष झाली. परंतु यावर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने झेंडा वंदन कसे करायचे हा प्रश्न विरार जवळील नंदाखालजवळील उमराळा वाडीत राहणाऱ्या आणि सेंट  जोसेफ शाळेच्या विद्यार्थ्यांना पडला होता. परंतु त्यांना आगळावेगळा झेंडा वंदन करून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. 

विरार जवळील नंदाखाल येथील उमराळा वाडीत राहणारी मुले सेंट जोसेफ शाळेत जात होती. परंतु सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थी झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकली नाही. त्यामुळे चिमुकल्यांनी अनोखा मार्ग काढला. त्यांच्याकडे झेंडा नसल्याने त्यांनी कागदाचा तिरंगा बनवून तो काठीला चिटकवला आणि वाडीत हा झेंडा उभा केला. शाळा बंद असल्या तरी त्यांनी शाळेचा ड्रेस घालून  तिरंग्याला  सलामी दिली. ध्वजवंदन करून जन गन मन हे राष्ट्रगीत आणि झेंडा उंचा रहे हमारा तसेच भारताची प्रतिज्ञा म्हटली

ही चारही भावंड  आदिवासी वारली समाजाची आहेत.  प्रियांका अनिल वाघ, अनुष्का अनिल वाघ, जतीन अनिल वाघ अशी त्यांची नवे असून त्यांचे शाळेतर्फे आणि नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Corporation Protest: जंतर-मंतर आंदोलनाचे महापालिकेत पडसाद; सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोषणाबाजी

Harmony Park: संगीताच्या सुरांमध्ये योगा आणि खेळ, ५० रुपयांच्या तिकिटात स्वप्नवत सफर! ३०० टन भंगारातून साकारल्या कलाकृती

Latest Marathi News Live Update : न्यायालयाने डॉ. मनोज शिरुरे यांचा जामीन अर्ज फेटाळला

सुबोध भावेने साकारली गोंदवलेकर महाराजांची भूमिका, अभिनेत्याबद्दल अनुभव सांगताना अर्थव सुदामे म्हणाला... 'त्यांनी पैसे...'

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

SCROLL FOR NEXT