मुंबई : धारावीत आज दिवसभरात 4 रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या 2676 इतकी झाली आहे. तर केवळ 84 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दादर मध्ये 13 रुग्ण तर माहीम मध्ये 13 नवे रुग्ण सापडल्याने जी उत्तर मध्ये 30 रुग्णांची भर पडली आहे.
दादर मध्ये आज 13 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 2250 इतकी झाली आहे.तर 450 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीम मध्ये आज 13 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 2025 इतकी झाली. तर 243 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.तर संपूर्ण जी उत्तर मध्ये एकूण 777 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
जी उत्तर विभागातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत 30 रुग्णांची भर पडली असून जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ही 66951 वर पोहोचली आहे.तर धारावी मध्ये 2333,दादरमध्ये 1710 तर माहीम मध्ये 1705 असे एकूण 5748 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.