Well  sakal media
मुंबई

मुंबईतील 84 विहिरी गायब; RTI मध्ये माहिती उघड

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत एकेकाळी पाण्याचे स्त्रोत (water supply) असणाऱ्या अनेक जुन्या विहिरी (well in mumbai) आहेत. त्यातील कुर्ला विभागातील (kurla) तब्बल 84 विहिरी गायब झाल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून (RTI) सामोर आली आहे. विशेष म्हणजे या विहिरींबाबत कोणतीच नोंद सरकार दफ्तरी (no government record) नाही.

कुर्ला परिसरात 84 विहिरी आहेत. या 84 विहिरींमध्ये 43 खासगी मालाकीच्या, 38 सरकारच्या आणि 3 महापालिकेच्या विहिरी होत्या. विशेष म्हणजे 2017 च्या वचननाम्यात मुंबईतील विहिरी पुनरुज्जीवित करू अस आश्वासन शिवसेनेने दिल होत. अस असताना उलट 84 विहिरी गायब झाल्या असून या विहिरीचं नेमकं काय झालं याची माहिती देखील सरकारकडे नाही. कुर्ला परिसरात एल वॉर्ड मध्ये हा प्रकार उघडकीस आला असून एकूण 84 विहिरी गायब झाल्या आहेत.या विहिरी हरवल्या असल्या तरी या कश्या हरवल्या, या बुजवल्या गेल्या आहेत का ? याबाबत अशी कोणतीही नोंद सरकार कडे नाही.

मुंबईतील अनेक भागातपरंपरिक विहिरी आहेत. पाण्याची समस्यां मिटविण्यासाठी या विहीर बांधण्यात आल्या, यात खासगी, सरकारी आणि काही मालाकीच्या होत्या. मात्र कालांतराने या विहिरी गायब झाल्या आहेत. माहिती अधिकर कार्यकर्ते सागर उगले यांनी याबाबत कीटकनाशक विभागाकडून माहिती मागवली असता विहीरीचे पुनर्जीवन झाल्याची माहितीच नसून विहिरी गायब झालेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र विहीरी कशा गायब झाल्या याची माहिती अस्पष्टच आहे. दरम्यान शिवसेनेने देखील विहिरी पुनर्जीवित करू अस आश्वासन दिलं होतं मात्र त्याचा शिवसेनेला विसर पडला असल्याचं ही यावरून स्पष्ट होत आहे, असेही उगले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Ganesh Visarjan Live: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला उत्साहात सुरुवात, बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

SCROLL FOR NEXT