मुंबई

नागराज म्हणतो, नवं वर्ष नवं जावं.. वाचा पूर्ण कविता..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नवीन वर्षाच्या आमनाचा सर्वत्र जल्लोष साजरा होत आहे. अनेक सिने कलाकार आपल्या चाहत्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी देखिल आपल्या चाहत्यांना नविन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'नवं वर्ष नवं जावं ह्या सदिच्छा !' म्हणत नागराज मंजुळे यांनी चाहत्यांसाठी फेसबूक वर एक कविता पोस्ट केली आहे.

पिस्तुल्या या शॉर्ट फिल्म तसेच फॅंड्री, सैराट च्या अफाट यशा नंतर नागराज मंजूळे यांनी चाहत्यांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्मान केले आहे. चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजूळे हा एक कवी देखील आहे. त्याच्या कवितांचा देखील मोठा चाहता वर्ग आहे. चित्रपटांबरोबरच त्याच्या कविता संग्रहाला देखिल साहित्य क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. उन्हाच्या कटा विरुध्द हा त्याचा कविता संग्रह प्रसिध्द आहे. आज चाहत्यांना नविन वर्षांच्या शुभेच्छा देताना देखिल नागराजने कवीता फेसबुक वर पोस्ट केली आहे. या कवितेला चाहत्यांच्या हजारो लाईक्‍स आणि कॉमेंट्‌स मिळालेल्या आहेत.

वाचा नागराजची कविता

भटक्‍या
एकटा
भटकता
भटकता
मी स्वतःला
झोपलेलं पाहिलं

पाहिल...
की
मी स्वप्नात आहे.

स्वप्नात पाहिलं
की
मी भटकतोय

- नागराज बाबुराव मंजुळे.

नागराजने हि कविता चाहत्यांना नविन वर्षांच्या शुभेच्छा देताना फेसबुकवर पोस्ट केली आहे. नागराज मंजुळे यांच्या कवितांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. चित्रपट सृष्टीत येण्यापुर्वी नागराज मंजुळे एक कवि म्हणून पुढे आला. त्यांच्या उन्हाच्या कटा विरुध्द या कविता संग्रहाला मराठी साहित्य विश्‍वातील मानाचा भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार देखिल मिळाला आहे.

Webtitle : well known director nagraj manjule writes a poem to welcome new year

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT