मुंबई

पश्‍चिम रेल्वेच्या एसी लोकलच्या फेऱ्यांत वाढ 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवर अंधेरी ते चर्चगेट स्थानकादरम्यान वातानुकूलित (एसी) लोकलच्या फेऱ्यांत वाढ होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत या फेऱ्या वाढणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 25 डिसेंबर 2017 पासून पश्‍चिम रेल्वेवर एसी लोकल धावत आहेत.

सध्या एसी लोकलच्या 6 फेऱ्या चालविण्यात येत असून त्यापैकी सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी एक फेरी तर उर्वरित फेऱ्या दुपारच्या वेळेत घेण्यात येतात. दरम्यान दिवसेंदिवस एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भर पडली असल्याने एसी लोकलच्या फेऱ्यांत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे एक अधिक लोकल पश्‍चिम रेल्वेवर दाखल झाली असून या लोकलच्या मदतीने अतिरिक्त 6 फेऱ्या करण्याचा विचार पश्‍चिम रेल्वे करीत आहे. या नवीन एसी लोकलने आता पश्‍चिम रेल्वेवर एसी लोकलची संख्या 4 झाली आहे. 

साध्या लोकल प्रवाशांचा केला सर्व्हे 

एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी पूर्वीच्या सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द कराव्या लागणार असल्याने साध्या लोकलच्या प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी एक सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये चर्चगेट ते वांद्रा स्थानंकादरम्यान धावणाऱ्या साध्या लोकलला प्रवाशांची संख्या अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या लोकलच्या जागी एसी लोकल चालवण्याचा विचार पश्‍चिम रेल्व ेकरीत आहे. त्यानुसार सकाळी विरार ते चर्चगेट दरम्यान तीन फेऱ्या आणि तीन फेऱ्या अंधेरी ते चर्चगेट दरम्यान दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत. त्यामुळे एसी लोकलच्या अतिरिक्त 6 फेऱ्या होणार आहेत.  

web title : Western Railway's AC local trips increased

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT