मुंबई

पश्‍चिम रेल्वेच्या बम्बार्डियर लोकल होणार सुसाट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: पश्‍चिम रेल्वेच्या धीम्या मार्गांवरील प्रवाशांनाही नव्या वर्षात आता सुसाट प्रवासाचा अनुभव येणार आहे. चर्चगेट ते बोरिवलीपर्यंत धावणाऱ्या बम्बार्डियर लोकलचा धीम्या मार्गावरील वेग प्रतितास 70 कि.मी.वरून 90 कि.मी.पर्यंत वाढवण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. 

पश्‍चिम रेल्वे मार्गावर नव्या आधुनिक, अधिक आरामदायी आणि मोकळी जागा असणाऱ्या बम्बार्डियर लोकल धावत आहेत. "एमयूटीपी दोन'अंतर्गत मुंबईकरांसाठी उपनगरी मार्गावर नव्या 63 बम्बार्डियर लोकल आहेत. त्यांची कमाल क्षमता प्रतितास 110 कि.मी. आहे; मात्र या लोकल ताफ्यात दाखल झाल्या त्या वेळी त्यांचा वेग प्रतितास 70 कि.मी. नसावा, अशी प्राथमिक अट होती. जलद मार्गांवर बम्बार्डियर लोकलचा वेग 80 ते 100 कि.मी. प्रतितास असून धीम्या मार्गांवरील वेग वाढवल्यास प्रवासाच्या वेळेत काही मिनिटांची बचत होणार आहे. यात धीम्या मार्गावरील लोकल 90 कि.मी. प्रति तासाच्या वेगाने धावू शकतात. परंतु धीम्या मार्गावर 70 तर जलद मार्गावर 100 कि.मी. प्रति तासाच्या वेगाने बम्बार्डियर लोकल सध्या धावतात. त्यामुळे धीम्या मार्गावरील बम्बार्डियरचा वेग वाढवण्यात येणार आहे. 

चर्चगेट ते बोरिवलीदरम्यान धावणाऱ्या बम्बार्डियर लोकलचा धीम्या मार्गावरील वेग वाढवण्यात येणार आहे. यामुळे पश्‍चिम रेल्वेचा वक्तशीरपणा सुधारण्यास मदत होईल. 
- रवींद्र भाकर, 
मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्‍चिम रेल्वे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: पत्नीने नवऱ्याला भोवऱ्यासारखा फिरवू नये, घरात भांडण होत असतील तर... सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय काय?

Silver Price: चांदीच्या किंमती एवढ्या का वाढल्या? कारणं कोणती? भविष्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

Jalgaon News : जळगाव फार्मसी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात! 'बाटू' विद्यापीठाकडून गुणपत्रिका मिळेनात; प्रवेशाचा अंतिम टप्पा रखडला

Vaibhav Suryavanshi : ४,४,६.. उप कर्णधार म्हणून पहिल्याच रणजी सामन्यात वैभवची २८०च्या स्ट्राईक रेटने खेळी, केल्या इतक्या धावा

Ex-servicemen: माजी सैनिकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारकडून मोठी दिवाळी भेट मिळाली, कुटुंबियांनाही होणार लाभ

SCROLL FOR NEXT