Crime
Crime 
मुंबई

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) विक्री करण्यासाठी आलेल्या राहुल कृष्णाजी दुपारे (53) याला घाटकोपर पोलिसांनी अटक केली.

विद्याविहार पश्‍चिमेकडील कामा लेन येथे एक व्यक्ती "अंबरग्रीस'ची बेकायदा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मैत्रानंद खंदारे यांना मिळाली होती. त्यानुसार वनाधिकाऱ्यांच्या मदतीने सापळा लावण्यात आला होता. शनिवारी (ता. 15) दुपारे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात एक किलो 130 ग्रॅम वजनाची काळसर रंगाची गोलाकार दगडासारखी वस्तू दिसली. ही वस्तू व्हेल जातीच्या माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. एक किलो 130 ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 1 कोटी 70 लाख रुपये आहे. अंबरग्रीसचा वापर सुगंधी द्रव्य आणि औषध बनविण्यासाठी केला जातो. तसेच, ते जवळ बाळगल्यास किंवा घरात ठेवल्यास संपत्तीत वाढ होते, अशी धारणा असल्याचे आरोपीने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT