मुंबई

अबब ! व्हेल माशाच्या उलटीची किंमत पावणे तीन कोटी रुपये

मुलुंडमधून जप्त केली उलटी

मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: व्हेल माश्याची उलटी (Ambergris) म्हणजे समुद्रातील तरंगते सोने. याच उलटीच्या तस्करीचा प्रकार वन विभागाने उघडकीस आणला आहे. वन विभागाने मुलुंड मध्ये एका ठिकाणी छापा मारून 2.700 किलो व्हेल माश्याची उलटी जप्त केली असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमते 2 कोटी 70 लाख रुपये इतकी आहे. नमुदचा पदार्थ हा स्पर्म व्हेल माश्याच्या पोटात तयार होतो. (whale fish vomit price in crores from mulund vomit of whale seize by police)

नमुद पदार्थाचा वापर हा अति उच्च प्रतिचा परफ्युम, काही ठिकाणी औषधांमध्ये, तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य, तसचे खाद्य पदार्थामध्ये ,स्वाद वाढविण्याकरीता देखील केला जातो. सदरहू पदार्थाची खरेदी, विक्री करणे हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियम अंतर्गत बेकायदेशीर आहे. नमुद पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत करोडो रूपयांमध्ये आहे. कक्ष-4, गु.प्र.शा, गु.अ.वि, मुंबई यांस गोपनीय सूत्रांकडुन बातमी प्राप्त झाली की, "संरक्षित प्राणी व्हेल माश्याच्या उलटीच्या (Ambergris), खरेदी / विक्रीवर शासनाने बंदी आणलेली आहे

एक इसम ही वस्तू वस्तु बेकायदेशीर रित्या विकण्याकरीता मुलुंड परिसरात येणार प्राप्त गोपनीय माहिती वन विभागास प्राप्त झाली होती. त्या माहितीची प्रथम खातरजमा करण्यात आली व त्याबाबत वन विभागाचे अधिकारी यांचेशी संपर्क साधुन त्यांना सविस्तर हकिकत समजावण्यात आली. त्यानंतर पोलीस पथक व वन विभागाचे अधिकाऱ्यांनी बोमाटे चाळ, सालपादेवी पाडा, बॉम्बे ऑक्सीजन कंम्पनीच्या मागे, पी. के. मुलुंड पश्चिम या ठिकाणी छापा टाकला.

तेथे तीन इसम हे तपकिरी रंगाचे २.७०० किलो वजनाची व्हेल माश्याची उलटी विकत असतांना मिळुन आले. नमुदचा पदार्थ हा मारिन बायोलॉजिस्ट यांनी तपासून पाहिला असता, त्यांची खात्री झाली की, तो प्रतिबंधीत पदार्थ म्हणजेच व्हेल माश्याची उलटी (Ambergris) हेच आहे. सदर वेळी नमुदचा पदार्थ तसेच त्याची तस्करी करणाऱ्या तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरूध्द फिर्यादी यांनी मुलुंड पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास अॅन्टॉपहिल पोलीस करीत असल्याची माहिती सुरेश वरक, रेंज फॉरेस्ट ऑफिसर यांनी दिली.

काय आहे व्हेल माशाच्या उल्टी मागचे रहस्य

वैज्ञानिकांच्या मते अजूनही हे सिद्ध झाले नाही आहे की, ही नक्की व्हेल माशाची उलटी आहे की तिच्या शरीरातील मळ आहे. काही वेळा व्हेल माशाच्या शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. साधारणत: व्हेल मासा हा समुद्र किनाऱ्यापासून खुप दूर असतो. त्यामुळं व्हेल माशाच्या शरीरातून बाहेर निघालेला हा पदार्थ किनाऱ्यावर येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. याचे वजन 15 किलोपासून 50 किलोपर्य़ंत असते.

व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अॅम्बरग्रीस अत्तर किंवा सुगंधित उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीना विकले जाते. त्यात अॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. तर, काही देशांमध्ये अॅम्बरग्रीसचा वापर सुगंधित सिगरेट तयार करण्यासाठी होतो. प्राचीन चीनमध्ये या पदार्थाला ‘ड्रॅगननं थुकलेला सुगंध’, असे ओळखले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात या पदार्थाची किंमत काही कोटींच्या घरात असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ

IND vs NZ: अभिषेक शर्माने का पूर्ण केली उपकर्णधार अक्षर पटेलची ओव्हर? पहिल्या T20I असं काय घडलं, जाणून घ्या

Bus-Tanker accident : राष्ट्रीय महामार्गावर बस अन् टँकरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जखमी

IND vs NZ, 1st T20I: १४ षटकार अन् २१ चौकार... भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या! जाणून घ्या कोणते विक्रम रचले

Baramati Elections : बारामतीत उमेदवार यादी जाहीर; जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय गणिते बदलली

SCROLL FOR NEXT