Ashok Chavan_BJP
Ashok Chavan_BJP 
मुंबई

Video : गलती से मिस्टेक! भाजपप्रवेश करताच हे काय बोलून गेले अशोक चव्हाण! फडणविसांनी तत्काळ चूक केली दुरुस्त

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांचा आज देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश झाला. यावेळी आपली भूमिका मांडताना अशोक चव्हाण यांनी बोलायला सुरुवात करताच एक चूक केली. त्यांच्या विधानानंतर भाजपच्या पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. (ashok chavan enters bjp and done mistak during speaks in press conference fadnavis immediately corrected)

अशोक चव्हाणांची झाली मोठी चूक

अशोक चव्हाण यांना प्राथमिक सदस्यत्व दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. त्यानंतर त्यांनी चव्हाण यांना आपली भूमिका मांडण्याची विनंती केली. त्यानंतर सुरुवातीलाच चव्हाण म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष बानवकुळेजी आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार...असं म्हणताच फडणवीसांनी त्यांची झालेली चूक लक्षात आणून देत सांगितलं की, मुंबई भाजपचे अध्यक्ष....त्यानंतर चव्हाण यांनी म्हटलं की हो नेहमीचीच सवय झाली आहे. पण त्यांच्या या विधानावर एकच हशा पिकला. यावेळी चव्हाण क्षणभर ओशाळल्यासारखं झालं. (Latest Marathi News)

आदर्श घोटाळ्यावर केलं भाष्य

चव्हाण पुढे म्हणाले, "आजचा माझा भाजपतला पहिलाच दिवस आहे. माझ्यावर मोठी जबाबदारी टाकू नका. इतर लोकांना घेण्याची जबाबदारी बावनकुळे चांगले करत आहेत. आरोप प्रत्यारोप होत असतात. देशात शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळायला पहिजे. जे आंदोलन होत आहे त्यावर नक्कीच लक्ष घालू. (Marathi Tajya Batmya)

आदर्श घोटाळ्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण म्हणाले, "हा प्रश्न उशीराच विचारला. पण कोर्टात आमच्या बाजूने निकाल आला आहे. हा काही फार चिंतेचा विषय नाही. हा निर्णय सोपा नव्हता. हा निर्णय घेताना मी खूप विचार केला. काही गोष्टी चांगल्या होत आहेत तर त्यात आपला पण वाटा हवा"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT