मुंबई

वसई कला-क्रिडा महोत्सवाबाबत अझरुद्दीन काय म्हणाला...

सकाळ वृत्तसेवा


विरार : वसईच्या वैभवात भर टाकणारा हा कला-क्रीडा महोत्सव आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी हा महोत्सव सुरू केल्यामुळे कला व क्रीडा क्षेत्रात भविष्य घडवू पाहणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. या महोत्सवातून अनेक खेळाडू घडावेत असे वाटते, असे गौरवोद्‌गार भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महम्मद अझरुद्दीन यांनी ३० व्या वसई कला-क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी काढले.

वसई तालुक्‍यातील महत्त्वाचा कला-क्रीडा महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३० व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाचे गुरुवारी (ता. २६) मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले. या महोत्सवात ५५ हजारांहून अधिक कलाकार आणि खेळाडूंचा सहभाग आहे. महोत्सवाच्या उद्‌घाटनाला माजी क्रिकेटपटू महम्मद अझरुद्दीन, छत्रपती पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू इशांत नक्वी, क्रिकेटपटू मनाली दक्षिणे, आमदार राजेश पतिलांडर, आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्‍स, पंचायत समितीचे सभापती संजय म्हात्रे, माजी महापौर राजीव पाटील, माजी महापौर नारायण मानकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबनशेठ नाईक उपस्थित होते.

आजचा हा उद्‌घाटन सोहळा पाहून शाळेतील दिवस आठवले. या महोत्सवातून ऑलिम्पिकसाठी खेळाडू गेल्याचे ऐकून आनंद झाला. असा महोत्सव होतो हे माहिती नव्हते. यापुढे महोत्सवातून अनेक खेळाडू आणि कलाकार घडोत अशा शुभेच्छा.
- इशांत नक्वी, छत्रपती पुरस्कारविजेते बॅडमिंटनपटू
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT