Rohit Pawar eSakal
मुंबई

Rohit Pawar: ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी रोहित पवार काय म्हणाले? अजित पवारांनाही लगावला टोला

रोहित पवार यांची आज ईडीच्या कार्यालयात चौकशी होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून आज चौकशी केली जाणार आहे. चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी विधानभवनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांवर देखील टोला लगावला आहे.

रोहित पवार म्हणाले, "मी एवढचं सांगेन अधिकारी त्यांचं काम करत असतात त्यांनी जी कागदपत्रं मागवली ती मी दिली आहे. पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करेल. यामागे काय विचार? कुठली शक्ती? हे आत्ताच सांगता येत नाही. मोठा आवाज आम्ही एका बलाढ्य शक्तीविरोधात लढत आहोत म्हणून कदाचित ही कारवाई झाली असेल"

आत्तापर्यंत जी माहिती मागवली आहे तीच माहिती आम्ही सीआयडी, ईडब्ल्यूओ आणि ईडीला देखील दिली आहे. तीच माहिती आता पुन्हा घेऊन ईडीच्या कार्यालयात मी स्वतः जाणार आहे. ईडीचे अधिकारी जे काही विचारतील त्याची उत्तरं देऊ, तिथं मोकळा वेळ मिळाला तर लोकांचे विषय जे सरकारकडून सुटत नाही त्यावर नक्कीच विचार करेन, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

चौकशीनंतर शरद पवारांच्या मार्गदर्शनासाठी पुन्हा लढण्यासाठी तयार असू. महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विचारांनी चालणारा मी एक मराठी माणूस आहे. त्यामुळं प्रामाणिकपणे जे काही सहाकार्य करायचं ते करेनचं पण पळून जाणार नाही.

जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहीन असंही पवार यांनी म्हटलं. तसेच यानंतर विधानभवन परिसरात जाऊन त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर डोक ठेऊन नमस्कार केला छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. तसेच भारतीय संविधानाला झुकून त्यांनी नमस्कार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

National Volleyball Player Dies: राष्ट्रीय हॉलीबॉलपटू व प्रयोगशील शेतकरी रमेश सहालुगडे यांचे विहिरीत पडून अपघाती निधन

Pune Civic Schools PPP: आकांक्षा फाऊंडेशनसह अन्य संस्थांना मनपा शाळांचे दरवाजे खुले; गणेश बिडकर यांची घोषणा

IND A vs SL A : वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूंमध्ये मोठा राडा, भारताच्या पराभवनंतर मैदानात ड्रामा, Viral Video

SCROLL FOR NEXT