Baba Siddiqui Murder ESakal
मुंबई

Baba Siddiqui: कार्यक्रमाला उपस्थिती, फटाके फोडताना साधला डाव, वाचा बाबा सिद्धिकींचा हत्येचा थरार!

Baba Siddiqui Murder: वांद्रे पूर्व परिसरात बाबा सिद्धिकींची हत्या करण्यात आली आहे. वाचा त्यावेळी नेमकं काय घडलं?

Vrushal Karmarkar

Baba Siddiqui Murder: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या घटनेत बाबा सिद्दीकी यांना तीन गोळ्या लागल्या असून त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. घटनात घडताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. सिद्दीकी यांच्यावर हा हल्ला त्यांचा मुलगा जीशान सिद्दीकी यांच्या वांद्रे खेरवाडी सिग्नलच्या कार्यालयाजवळ झाला. या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर परिसरात रात्री नऊ सव्वानऊ वाजता ही घटना घडली आहे. बाबा सिद्दीकी निर्मल नगर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात गेले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी झाली. तिकडे फटाके फोडण्यात येत असताना त्या आवाजात गोळीबार त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. तीन ते चार बंदुकीचे राऊंड त्यांच्यावर फायर करण्यात आले होते.यात त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. या घटनेत त्यांना छातीत गोळी लागली होती. गोळी लागल्यानंतर बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

दरम्यान तीन ते चार तरुणांकडून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे या घटनेत बाबा सिद्दीकी यांच्या सहकाऱ्यालाही गोळी लागली आहे. त्यांचा सहकारी या घटनेत जखमी झाला आहे. याआधी काही दिवसांआधीच बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर ही घडना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Latest Marathi News Live Update : कलम २९ए(९) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होते, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतेच ते मर्यादित आहे - न्यायासन

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

SCROLL FOR NEXT