ऑनलाईन लर्निंगचा फुगा
सकाळचे साडे आठ वाजत आहेत. कार्पेटवर लोळत असलेल्या मुलांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न शिक्षिका करीत आहेत. त्यांच्या गाण्याने चित्र बदलते. दुसरीकडे एक शिक्षिका मुलांना ऑनलाईन सर्व्हे रोज भरण्याची आठवण करुन देत आहेत. त्याचवेळी या सर्वांपासून दूर, काहीशे किलोमीटर अंतरावर काही विद्यार्थी या ऑनलाईन लर्निंगला सामोरे जाताना काहीसे भांबावले आहेत…
अमेरिकेतील शाळा बंद होऊन आणखी एक आठवडा उलटला, पण सर्वच शाळांतील अभ्यासक्रमाची स्थिती सारखी नाही. काही शाळांत मार्चच्या मध्यापासून ऑनलाईन
लर्निंग सुरु झाले, तर काही शाळांत काही दिवसांपूर्वीच.
टर्म संपत आली, ग्रेडचे काय करायचे हा त्यांच्यापुढचा प्रश्न आहे. काही शाळांनी ऑनलाईन परिक्षा सुरु केली, तर काही शाळा सरसकट सर्वांना थेट अ श्रेणी देऊन प्रश्न निकालात काढत आहेत. आता यातील महत्त्वाचा प्रश्न हा की, शहरापासून दूर, दूर्गम भागांत असलेल्या घरांत इंटरनेट कसे असेल, त्याहीपेक्षा एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर छप्पर नसेल, पुरेसे खायला नसेल, अभ्यासाला महत्त्व देणारे पालक नसतील आणि इंटरनेटची भाषा कळत नसेल तर काय?
फार नव्हे, तर अगदी तीन वर्षांपूर्वी अमेरिकेतील सव्वा कोटी मुलांच्या घरी इंटरनेटची सुविधा नव्हती. आता याचवेळी घरात कोणी आजारी असेल, तर त्यांच्याकडे लक्ष दिले
जाणार, की मुलगा-मुलगी इंटरनेटवरुन कसे शिकतात याकडे?
शहरातील शाळांना गरीब मुलांची ऑनलाईन उपस्थिती मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने वायफाय सुविधा वाढवण्यास सुरुवात केली आहे. पण त्यानंतरही त्याचा फायदा किती जणांना होणार हा प्रश्नच आहे. ही शैक्षणिक पीछेहाटीची अभूतपूर्व सुरुवात आहे, त्याचा फटका एका पिढीला बसणार आहे, असा इशारा अमेरिकेतील अभ्यासक देत आहेत. विद्यार्थी ऑनलाईन लर्निंगला किती तयार आहेत, हा प्रश्न दूरचा आहे, किती शिक्षक यासाठी तयार आहेत, अशीही विचारणा होत आहे.
ऑनलाईन लर्निंगलाही फारसे यश आलेले नाही. शिक्षक - विद्यार्थी संवाद होत नाही. नियमीतपणे उपस्थिती नसते. लॉस एंजलीसमधील साठ टक्के पालकांनी हे योग्य असल्याचे सांगितले.
41टक्के पालकांनी इंटरनेटचा प्रश्न कसा सोडवणार ही विचारणा केली. ऑनलाईन लर्निंगपेक्षा घरात जास्त प्रश्न भेडसावत आहेत, त्यामुळे काही राज्यांत एका आठवड्यात ऑनलाईन लर्निंगचा प्रतिसाद 50 टक्क्यांनी कमी झाला. शाळा सुरु होतील, त्यावेळी विद्यार्थ्यांना कसे तयार करायचे, त्यांना काय शिकवायचे. कशावर भर द्यायचा याचा विचार करायला हवा. ऑनलाईन लर्निंगने फारसे काही साध्य झाले नाही. नेमकी गरज कशाची आहे हे खर तर आता ओळखण्याची वेळ आली आहे.
अरे पास्ता पास्ता देखो…
कोरोनामुळे इटलीत आर्थिक प्रश्न घोंघावत आहेत, पण पास्ता, तयार सॉसेजेस, यीस्ट्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांत सध्या चांगलीच लगबग आहे. जगभरात सर्वत्र खाद्यनिर्मीती कंपन्यांसमोर सध्या तरी गंभीर प्रश्न नाहीत. मात्र इटलीतील अभ्यासक यातील ‘सध्या तरी’ यास जास्त महत्त्व देतात. उद्या काही मिळेल याची लोकांना आज खात्री नाही, त्यामुळे ते जास्त खरेदी करीत आहेत. पण एकदा का कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कठोर उपाययोजना थंडावल्या, सर्व काही सुरळीत झाले की काय, हा प्रश्न या कंपन्यांना सतावत आहे
लॉकडाऊनमध्ये खाद्यनिर्मीती करणाऱ्या तसेच त्याचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना सूट मिळाली आहे. त्याचा फायदा त्यांना होत आहे. काहींनी वर्तमानपत्रांत मोठ्या जाहीराती देत आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. मात्र लॉकडाऊन संपले, की अनेकांचे हात आखडते घेतले जातील. लोकांना घरच्या खाद्यपदार्थांची आता जास्त सवय लागली आहे. सध्या अनेक कंपन्यातील उपस्थिती पन्नास टक्क्यांवर आणल्यामुळे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे मागणी जास्त दिसत असल्याचे चित्रही निर्माण झाल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र एकदा सर्व कर्मचारी रुजू होण्याची वेळ आल्यावर कायकदाचित त्यावेळी आत्ताची असलेली मागणीही खूपच कमी भासेल. कर्मचारी कपातीचा निर्णय होईल. अनेक घरांत एकच कमावता असेल, तेथे खर्च कमी होत जातील. नवे पीछेहाटीचे चक्र सुरु होईल. आता मागणी असलेला हा पास्ता तेव्हा किती पसंतीस उतरेल हा प्रश्नच आहे.
आरोग्य सेवा दुर्लक्षित केल्याचा परिणाम
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना वैद्यकीय सुविधा कमी पडत आहेत, यास राजकीय नेतेच जबाबदार आहेत, असा आरोप इंग्लंडमधे केला जात आहे. गेल्या कित्येक सरकारांनी राष्ट्रीय आरोग्य सेवेस दुर्लक्षित केले. त्यावरील खर्च कमी करीत नेले. त्यामुळे रुग्णालये कमी आहेत, रुग्णालयांत पुरेसे कर्मचारी नाहीत, त्यांना योग्य मार्गदर्शन नाही आणि चांगल्या सुविधा नाहीत. राजकीय नेत्यांनी कर कमी करीत आणला आणि मग खर्च कमी करण्यासाठी आरोग्य सेवेत काटछाट करण्यात आली. आता तरी किमान यातून धडा शिकून करआकारणी योग्य प्रकारे केली जाईल आणि आरोग्य सेवेसाठी योग्य तरतूद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.