Pravin Darekar Devendra Fadnavis esakal
मुंबई

Mumbai : सहकारी गृहनिर्माण परिषदेत झालेल्या घोषणांचे जीआर कधी; आमदार प्रवीण दरेकर

सोमवारी मंत्रालयात बैठक; चारकोप, गोराईमधील इमारतींच्या स्वयंपूनर्विकासास चालना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सहकारी गृहनिर्माण परिषदेत ज्या घोषणा झाल्या त्याचे जीआर काढण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले असल्याची माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली. याचबरोबर घोषणा झालेले सर्व विषय मार्गी लावण्यासाठी सोमवार (ता.२९) रोजी मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते शनिवार (ता. २७) रोजी कांदिवली, चारकोप येथील 'राकेश' गृहनिर्माण सहकारी संस्थेचा स्वयंपुनर्विकासांतर्गत भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी चारकोप, गोराई हे स्वयंपुनर्विकासाचे हब होतेय, मुंबईला आदर्श घालून द्यायचा आहे, असे प्रतिपादन दरेकर यांनी केले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी नगरसेविका संध्या दोशी, आर्किटेक हर्षद मोरे, व्यंकटेश कामत, ऍड. अखिलेश चौबे, नगरसेवक श्रीकांत कवठणकर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, गेल्या १५-२० वर्षांपासून इमारतीचा पुनर्विकास गृहनिर्माण संस्थेने स्वतःच स्वतःचा करावा अशा प्रकारचा एक विषय घेऊन मी एक चळवळ उभी केली. स्वयंपुनर्विकास एक चळवळ म्हणून उभी राहिली आहे. यात राज्य सरकारलाही सहभागी केले आहे.

नेस्को मैदानावर अभूतपूर्व परिषद झाली. त्यावेळी झालेल्या घोषणांचे जीआर बनण्याची प्रक्रिया सुरु झाली. हे सरकार आपल्या पाठीशी आहे. मागणी वाढतेय यासाठी सरकारकडे सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन करण्याची मागणी केली आहे. सेल्फ डेव्हलपमेंट महामंडळ स्थापन करणार आल्याची घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली आहे. लवकरच ते कार्यान्वित करून घेऊ अशी माहितीही दरेकर यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर लहानपणापासूनच करा ‘या’ गोष्टी; करीना कपूरने सांगितला पालकांसाठी खास सल्ला

Latest Marathi News Live Update : पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर टीका; बडतर्फीची मागणी

SCROLL FOR NEXT