मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन जेव्हा मुंबईतला रस्ता विसरतो, तेव्हा रिक्षाचालक म्हणतो मला फॉलो करा

पूजा विचारे

मुंबईः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मुंबईच्या गर्दीत सचिन तेंडुलकर रस्ता चुकल्याचं दिसतंय. सचिन यांनी आपल्या आलिशान कारमधून हा व्हिडिओ शूट केला आहे. 

सचिन तेंडुलकर कांदिवली पूर्व येथून आपल्या घरी बांद्राला जात होता. त्याच दरम्यान मास्टर ब्लास्टर रस्ता चुकला. सध्या उपनगरात अनेक मेट्रोची कामं सुरु असल्यानं काही मार्ग वन- वे केलेत. यामुळेच सचिन तेंडुलकरला रस्ता सापडत नव्हता. त्याच दरम्यान एका रिक्षा चालकानं त्याला ओळखलं आहे आणि त्यानं सचिनला हायवे पर्यंतचा रस्ता दाखवला. मुंबईच्या रिक्षाचालकाला जेव्हा सचिननं रस्ता विचारला तेव्हा मराठीतून रिक्षा चालक त्याला म्हणाला की, मला फॉलो करा. 

मंगेश फडतरे असं या रिक्षाचालकाचं नावं असून त्याने सचिनला आपल्या रिक्षाला फॉलो करण्यास सांगितलं. त्यानंतर रिक्षा चालकाला फॉलो करत सचिन हायवे वर पोहोचला. पुढे हायवे वर पोहोचल्यावर सचिननं कार बाजूला लावली. त्या रिक्षाचालकाची चौकशी करत त्याच्यासोबत सेल्फीही काढला.

रस्ता चुकल्याचं हा व्हिडिओ सचिननं आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला आहे. त्यात मास्टर ब्लास्टरनं हा व्हिडिओ किस्सी जानेवारी २०२० असं म्हटलं आहे.

When master blaster Sachin forgets road Mumbai the rickshaw says follow me

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकरी कर्जनिवारणास हवे ३५ हजार कोटी, अर्थसंकल्पात घोषणा शक्य; नियमित कर्ज फेडणाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन

Krishna Satpute Exclusive: आई-वडिलांचे छत्र हरवलं, पण खडतर प्रवास करत तो टेनिस क्रिकेट आयकॉन बनला; धोनीच्या शॉटने दिली नवी ओळख

Latest Marathi News Live Update : राज्यभर आज शिवजयंतीचा उत्साह; विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

Pune Accident: १२ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी कारने गेले, पुण्यातील ३ मित्रांचा अपघाती मृत्यू; इंजिन तुटून दूरवर फेकलं गेलं!

Chhatrapati Shivaji Maharaj : दुष्काळाच्या सावलीत जन्मले शिवराय; सोन्यालाही कवडीमोल भाव, कठीण बालपणातून कसं घडलं स्वराज्याचं भविष्य?

SCROLL FOR NEXT