मुंबई

खड्डे बुजविणारे जेट पॅचर यंत्र कुठे आहे?

सकाळ वृत्तसेवा

ठाणे:  महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत एकाच दिवसात तब्बल 185 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. पण खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेत दाखल झालेल्या जेट पॅचरच्या यंत्रासाठी निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव मात्र आज नामंजूर करण्यात आला. 

महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्यांवर पावसाळ्यामध्ये पडणारे खड्डे बुजविण्यासाठी जेट पॅचर यंत्र विकत घेतले असून त्यासाठी सलग दोन वर्षांच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या वर्षातील तरतुदीला मान्यता मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, बैठकीमध्ये शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून नगरसेवकांनी बांधकाम विभागाला धारेवर धरले. शहरात खड्डे बुजविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणले जात असल्याचा दावा केला जात असल्याने शहरात खड्डे का बुजले जात नाहीत, असा प्रश्‍न या वेळी उपस्थित करण्यात आला. एवढेच नव्हे, तर बांधकाम विभागाचे अधिकारी गाजावाजा करीत असलेले खड्डे भरणारे जेट पॅचर यंत्रच कार्यरत नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. 

त्याचवेळी शहरातील खड्ड्यांमुळे संतापलेल्या नगरसेवकांनी दोन कोटी रुपयांचा जेट पॅचर यंत्राचा प्रस्तावच तहकूब केला आहे. जेट पॅचरच्या यंत्राद्वारे जर खड्डे बुजविले जात असतील तर हे यंत्र कोठेकोठे कार्यरत आहे, असा प्रश्‍न या वेळी उपस्थित करण्यात आला. मात्र, त्यावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्याने हा ठरावच थेट तहकूब करण्यात आला. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारताच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीला होणार सुरुवात! 'या' संघाविरुद्ध क्वार्टर-फायनलचा सामना, पाहा Schedule

Leg Cramps: रात्री पायात तीव्र कळ; स्नायू आखडतात अन् झोप उडते! जाणून घ्या शरीरातील पाण्याची कमतरता की गंभीर आजार?

Indrayani Express: इंद्रायणी एक्सप्रेस बालकासाठी थांबली; वेळेवर उपचाराने जीव वाचला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

SCROLL FOR NEXT