मुंबई

VIDEO | छे, कुठे आहे लॉकडाऊन ? बोरिवलीतील फळ बाजार सुरूच

सकाळ वृत्तसेवा


दहिसर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात १४ एप्रिल पर्यंत लॅाक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र बोरिवली पूर्वेकडील फळ बाजार मात्र अनधिकृतपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. 

बोरिवली पूर्व राजेंद्र नगर उड्डाणपुलाखाली गावकर हॉल शेजारी हा अनधिकृत फळबाजार पहाटे भरवला जातो. यावेळी  मोठ्या संख्येने ट्रक, टेम्पो, रिक्षांची याठिकाणी गर्दी होते. गेली अनेक वर्ष उड्डाणपुलाखाली हा अनधिकृत फळबाजार भरवला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त देखिल या परिसरात राहतात. अनधिकृत फळबाजारा बद्दल अनेकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र राजकीय संरक्षण असल्याने त्याकडे पालिकेचे संबंधित अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान बोरिवली पश्चिमेकडील पश्चिमेकडील फेरीवाल्यांबाबत बातमी प्रकाशित होताच तेथील बाजार बंद करण्यात आला आहे.

मात्र उड्डाणपुलाखाली बेकायदेशीर बसणाऱ्या व्यापाऱ्यांनी फळ विक्री सुरू ठेऊन नियम धाब्यावर बसवले आहेत. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी याठिकाणी फळे घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होते. दहिसर ते मालाड परिसरातील अनेकजण याठिकाणी सकाळच्या वेळेस फळे घेण्यासाठी येतात. या ठिकाणी असलेले विक्रेते मास्क, ग्लोज न लावता बिनधास्त परिसरात वावरत असल्याचे दिसून येते. पालिकेचे अधिकारी या फळबाजाराकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

Nanded Bhokar Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर ट्रक-टाटा मॅजिकची भीषण धडक; 5 जण जागीच ठार, 8 जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT