मुंबई

कोठडीत असताना अर्णब गोस्वामी मोबाईलवरुन सोशल मीडियावर लाईव्ह, चौकशी सुरु

पूजा विचारे

मुंबईः  रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या तातडीच्या सुटकेच्या विनंती अर्जावर मुंबई हायकोर्ट आज दुपारी ३ वाजता निर्णय सुनावणार आहे. त्यामुळं अर्णब यांना जामीन मिळणार की नाही याचा निर्णय आता आज होईल. तर अर्णब गोस्वामींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेले अर्णब यांनी मोबाईल फोन वापरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मोबाईल फोन वापरावर खातेनिहाय चौकशी करण्यात येतेय. 

अलिबागमध्ये न्यायालयीन कोठडीत असताना मोबाईल वापरल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही घटना अलिबागमधल्या क्वॉरटांईन सेंटरच्या शाळेत घडल्याचं बोललं जातंय.

अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना अलिबागमधील कोरोना सेंटर असलेल्या एका शाळेमध्ये क्वारंटाइन म्हणून ठेवण्यात आले होते. याचवेळी न्यायालयीन कोठडीत असताना शुक्रवारी अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल वापरल्याचं समोर आलं आहे. मोबाईल वापरताना अर्णब गोस्वामी हे सोशल मीडियावर लाईव्ह असल्याचं दिसलं. त्यानंतर गोस्वामी यांच्याकडे मोबाईल फोन कसा आला? याची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याच आली आहे.

चार दिवस कोरोना सेंटरमध्ये राहिल्यानंतर अर्णब गोस्वामी यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबरला अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबईतील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अलिबागला नेण्यात आले होते. अलिबाग कोर्टात हजर केल्यानंतर गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अर्णब गोस्वामींसह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

While custody Arnab Goswami live on social media from his mobile started inquiry

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT