खालापूर : तालुक्यातील कुंभिवली आदिवासीवाडीतील 28 वर्षीय तरूणाने सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्या तरुणाच्या शवविच्छेदन अहवालात तो कोरोनाबाधित असल्याचे उघड झाल्याने खालापूरवर पुन्हा कोरोनाची वक्रदृष्टी झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कुंभिवली आदिवासीवाडी सील करण्यात आली आहे.
महत्वाची बातमी : '18 मे'पासून पुढे काय? कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी...
आदिवासीवाडीतील तरूणाने पुलावरून द्रूतगती मार्गावर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला जखमी अवस्थेत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते; मात्र तो गंभीर जखमी असल्यामुळे उपचारासाठी त्याला जेजे रूग्णालय मुंबई येथे हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघाती मृत्यू असल्यामुळे शवविच्छेदन केले असता मृत तरूणाला कोरोनाची बाधा असल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, कुंभिवली आदिवासीवाडी सील करण्यात आली असून त्या तरूणाच्या संपर्कात आलेले डाॅक्टर, रूग्णवाहिका चालक यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत
मृत तरूणाला कोरोना नक्की कुठे झाला, याबाबत सांगणे कठिण असल्याने खबरदारीसाठी कुंभिवली आदिवासीवाडी सील करण्यात आली आहे. संपर्कात आलेले डाॅक्टर, रूग्णवाहिका चालक यांचा स्वॅब तपासणी अहवाल महत्वाचा आहे.
- इरेश चप्पलवार, तहसीलदार,खालापूर
who commits suicide is coronated, an atmosphere of fear among citizens
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.