मुंबई

...तर त्यांना भर चौकात फटकावलं पाहिजे- उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 'वीर सावरकरांची जे विटंबना करतात त्यांना भर चौकात फटकावलं पाहिजे, देशासाठी कोणी काय केलंय हे त्यांना ठाऊक नाही, राहुल गांधी ने देखील अश्या प्रकारे सावरकरांचा अपमान केलं होतं अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.दिल्लीत सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्या प्रकरणी ते बोलत होते.

पीक विमा योजनेबद्दल शिवसेनेने मोर्चा काढून कंपन्यांना 15 दिवसाची मुदत कंपन्यांना दिली होती. यानंतर शिवसेनेचे सर्व खासदार पंतप्रधानांना भेटले आणि यात काय सुधारणा करता येईल हे सांगितले.

शिवसेनेनं प्रत्येक तालुक्यात पीक विमा मदत केंद्र उभारली होती.केंद्र सरकारच्या योजनेत 53 लाख पात्र तर 90 लाख अपात्र शेतकरी ठरवले गेले.यातून 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी मदत शिवसेनेमुळे झाली.2000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणं होत ते पैसे कंपन्यांकडे अजून पडून आहेत. अशा प्रकारे हा घोटाळा सुरू आहे. 

शिवसेनेकडे या योजनेबद्दल बद्दल तक्रारी आल्या. शेतकऱ्यांना शिवसेना ही नुकसान भरपाई मिळून देणारच. 90 लाख शेतकऱ्यांना  कोणी अपात्र ठरवलं. त्यासाठी काय निकष लावले हे तपासण्याची गरज आहे. सरकारने कंपन्यांना त्यांचा नफा ठरवून द्यावा. हा पैसा सरसकट मिळावा नाही तर सरकारने तो पैसा परत घेऊन आपल्या यंत्रणेतून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा. जर कंपनी विमा देत नसेल तर त्यांना शासन झालं पाहिजे.

दुष्काळ आणि पूर सरकारला दिसत आहे पण या कंपन्याना दिसत नाही का? या योजने अंतर्गत ज्या सुधारणा गरजेच्या आहेत त्याबद्दल पंतप्रधानांशी बोलू,तरीही जर कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही तर या विरोधात शिवसेना आंदोलन करणार असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Hingoli Court : चोर कोर्टात तारखेसाठी आले अन् इन्व्हर्टर, बॅटरीच पळवली; हिंगोलीत चोरट्यांचा प्रताप, काय आहे प्रकरण?

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : 'काळजी करु नका, न्याय मिळवून देऊ'; उद्धव ठाकरेंकडून प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना ग्वाही

Shrigonda News: विवाहितेसह २२ वर्षीय तरुणाने एकत्रच संपवलं आयुष्य; नगरमधील घटनेनं खळबळ; पोलीस तपास सुरू

SCROLL FOR NEXT