मुंबई

देवेंद्र फडणवीसांशी नाव जोडलं जातय, तो रियाज भाटी कोण आहे?

एकवेळ छोटा राजनचा खास असलेला रियाज भाटी नेमकं काय करायचा?

सुरज सावंत

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) नवाब मलिक (Nawab malik) यांनी आज देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करताना रियाज भाटीचे नाव घेतले. हा रियाज भाटी कोण आहे? तो पंतप्रधान मोदींपर्यंत (Modi) कसा पोहोचला? असे अनेक प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत.

हा रियाज भाटी कोण आहे ते जाणून घेऊया?

रियाज भाटी हा गँगस्टर छोटा शकीलचा अत्यंत खास व्यक्तींपैकी असून 2006 मध्ये कमी दरात जागा मिळवण्यासाठी शकीलची मोठ्याप्रमाणात मदत घेतली. त्यावेळी हे प्रकण बाहेर आल्यानंतर भाटीवर मोक्‍का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच 2010 मध्ये अंधेरीतील जमिनीच्या विकासातून उद्भवलेल्या वादातून भाटी व त्याच्या साथीदाराने विकासकाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावले होते. त्यावेळी भाटी विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय ठाण्यातही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

भाटी पूर्वी छोटा राजनसाठी काम करायचा. राजनवर इंडोनेशियात झालेल्या गोळीबारानंतर भाटी त्याला भेटण्यासाठी तेथे निघाला होता.त्यावेळी त्याच्याकडे दोन पारपत्र असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याला अटक झाली होती. त्यानंतर तो छोटा शकीलचा जवळचा झाला. खंडाळा गोळीबार, मालाडमधील जमीन प्रकरणातही त्याचे नाव पुढे आले होते.

रियाज भाटी मुंबईत दाऊदचा हवालाचा सर्व कारोबार सांभाळायचा. तो व्यवसायानं बिल्डर आहे. पहिले त्याचं नाव २००७ आणि २००८मध्ये खंडाळ्यात झालेला गोळीबार, २००९मध्ये मालाडमध्ये जबरदस्तीनं जमीन काबिज करण्याच्या प्रकरणात आलेलं होतं.

रियाजकडून दोन बनावट पासपोर्ट जप्त केले गेले. यातील एक पासपोर्ट G3128659 जयपूरहून २००७मध्ये फूलजी भाटी या नावानं इशू झालंय. तर दुसरं २०१३मध्ये Z2479378 रियाजच्या नावानं आहे. पहिल्या पासपोर्टवर भाटीची जन्म तारीख १२ जून १९६८ आहे तर दुसऱ्या पासपोर्टवर तारीख फेब्रुवारी १९६२ आहे.

नुकतीच रियाजचं नाव गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक विमल अग्रवाल यांच्या तक्रारीतून समोर आलं आहे. या गुन्ह्यात परमबीर सिंह, सचिन वाझे यांच्यासह सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज सध्या फरार असून गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने त्यांच्या विरोधात NBW नाँन बेलेबल वारंट जारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे अज्ञाताकडून संभाजीनगरमध्ये होर्डिंग

SCROLL FOR NEXT