मुंबई

लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? "आरपीएफ' आणि "जीआरपी'चा एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न

प्रशांत कांबळे

मुंबई ः कोरोना काळात निवडक घटकातील प्रवाशांनाच लोकल प्रवासाची मुभा असताना मध्य आणि पश्‍चिम रेल्वेमार्गावर नुकत्याच महिलांच्या विनयभंगाच्या दोन घटना घडल्या. त्यामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, याप्रकारच्या घटनेनंतरही रेल्वे प्रोटेक्‍शन फोर्स (आरपीएफ) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी) एकमेकाकडे जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. 

गेल्या एका आठवड्यात महिला विनयभंगाच्या दोन घटना घडल्यानंतर आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे रात्रीच्या वेळी लोकलमध्ये महिलांना सुरक्षा देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची याबाबत विचारणा केली असता, जीआरपीची पहिली जबाबदारी असल्याचे आरपीएफ आयुक्त कार्यालयाकडून सांगितले आहे; मात्र प्रवासी सुरक्षेची जबाबदारी दोघांचीही असल्याचा दावा जीआरपी कार्यालयाकडून करण्यात आला. 

रेल्वेची मालमत्ता, स्थानकावरील सुरक्षा, वर्कशॉप, कारशेड यासह अनेक ठिकाणी सुरक्षा देण्याची जबाबदारी आरपीएफची आहे. जीआरपी हे राज्य सरकारच्या अख्यतारित येत असल्याने त्यांच्यावरच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक असल्याचे आरपीएफचे मुंबई विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अशरफ यांनी सांगितले आहे. त्यासोबतच जीआरपीला मदत करण्याचे काम आरपीएफचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जीआरपीकडे होमगार्ड आणि अन्य कर्मचारी अधिक असल्याने त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली होती. त्याशिवाय रेल्वे डब्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारीही जीआरपीचीच आहे. त्यामध्ये काही मदत लागल्यास आरपीएफकडून मदत केल्या जाते. 
- के. के. अशरफ,
आयुक्त, मध्य रेल्वे, आरपीएफ 

प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी जीआरपीची आहे. महिलांच्या छेडछाड संदर्भातील गुन्हे जीआरपीकडे नोंदवल्या जातात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, कायदा-सुव्यवस्था, चोरी, लुट, दरोडा, महिलाची छेडछाड हे सर्व प्रकार जीआरपीशी संबंधित आहे. 
- विनीत खर्ब,
आयुक्त, पश्‍चिम रेल्वे आरपीएफ 

जीआरपी आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. कोरोनाच्या काळात आमच्याकडे उपलब्ध संख्याबळानुसार सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला जातो. जीआरपी आपली जबाबदारी नाकारणार नाही. 
- रविंद्र शेनगांवकर,
आयुक्त, जीआरपी, मुंबई विभाग

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT