aedi.jpg 
मुंबई

आदित्य ठाकरे यांच्या नावाने माताेश्रीवर का येत आहेत पार्सल? याचे गुपित काय...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : ऑनलाईन शॉपिंगवर ऑर्डर न केलेल्या वस्तू युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नावाने 'मातोश्री'वर खपवणाऱ्या एका बड्या ऑनलाईन कंपनीच्या डिलेव्हरी बॉयला खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी त्याने चार वेळा या प्रकारे पार्सल पाठवून 'मातोश्री'च्या कर्मचाऱ्यांकडून अधिक पैसे उकळल्याचे समोर आले आहे. 

धीरेन मोरे (वय 20) असे या डिलेव्हरी बॉयचे नाव आहे. तो एका बड्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीत डिलेव्हरी बॉय म्हणून नोकरीला होता. धीरेन हा ग्राहकांच्या नावाने पार्सल तयार करून त्या पार्सलमध्ये कमी किमतीच्या वस्तू पॅक करून ग्राहकांकडून त्या वस्तूंची मोठी रक्कम वसूल करीत होता.

धीरेनने लहानसहान ग्राहकांना फसवता फसवता थेट मातोश्रीवर मजल मारली होती. याआधी धीरेनने चार वेळा मातोश्रीवर जाऊन हा प्रकार केला होता, ज्यामध्ये त्याला यश आले होते. कमी किमतीचे हेडफोन्स आणि इतर साहित्य धिरेनने मातोश्रीवर पोहोचवून जास्त रक्कम वसुल केली होती. मात्र आज चक्क आदित्य ठाकरेंशी त्याची गाठ पडल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्याच्यावर खेरवाडी पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपी धीरेन मोरे याने यापूर्वी असाच प्रकार सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत केला होता. ऑर्डर न दिलेल्या वस्तू आरोपी लोकांपर्यंत पोहोचवून जास्त रक्कम वसूल करत होता. मात्र रामदास आठवले यांनी केलेल्या तक्रारी नंतर तपासा दरम्यान त्याला अटक झालेली होती. 6 महिन्यापूर्वीच तो बाहेर आला होता मात्र पुन्हा त्याने अश्या कामाला सुरुवात केली होती. आज मातोश्रीवर हा सगळा थरार रंगला आणि पळून जाताना बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून खेरवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT