मुंबई

"मग महाराष्ट्रातच काय अडचण आहे?"; भाजपचा ठाकरे सरकारला सवाल

विराज भागवत

दिवसेंदिवस राज्यातील कोरोना बाधित रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लावायचा की नाही याबाबत राज्य सरकार आणि प्रशासन यांच्यात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाउनसदृश उपाययोजनांसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, लोकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळले नाहीत, तर आणखी कठोर नियम लावावे लागतील, असा इशारा सरकारने दिला आहे. या मुद्द्यावरून भाजपने ठाकरे सरकावर निशाणा साधला आणि केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. "देशातील इतर राज्ये कोरोनाचा प्रसार रोखतायत. मग महाराष्ट्रात काय अडचण आहे. राज्यातील सरकारला आपली सत्ता वाचवण्यात रस आहे. त्यामुळे त्यांचे सर्वसामान्यांच्या अडचणींवर लक्ष नाही. अशा परिस्थितीत केंद्रातील विविध विभागांनी राज्यात लक्ष घालावं. केंद्राने व्हेंटिलेटर पाठवले, पण प्रशिक्षण घेतलेली माणसं नाहीत म्हणून अनेक दिवस व्हेंटिलेटर पडून आहेत. असा कारभार करण्यापेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा", अशी मागणी दरेकरांनी केली.

"राज्यात कोरोनाचे आकडे वाढत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. कारण या सरकारमध्ये नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढतो आहे. सध्या पालक घाबरले आहेत. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी ते तयार नाहीत. आता सर्वसामान्यांपुढे असा प्रश्न आहे की लॉकडाउन केलं तर खाणार काय... शाळांची फी कुठून भरणार... त्यामुळे भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मागणीप्रमाणे आधी सर्वसामान्यांच्या खात्यात जगण्यासाठी आवश्यक पैसे भरा आणि मगच लॉकडाउनचा विचार करा", असं प्रवीण दरेकर म्हणाले. "महाविकास आघाडीतील घटक असूनही काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वसामान्यांचा विचार करून जे मत मांडले. त्याचं मी स्वागत करतो", असं दरेकर म्हणाले.

"कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हा वाढत होता, तेव्हा पहिल्या टप्यातच योग्य वेळी लॉकडाउन केला असता, तर कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला असता. मात्र तो योग्य पद्धतीने केला नाही, म्हणून कोरोना प्रादुर्भाव वाढला. हे सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरलंय. त्याचं मुख्य कारण सरकारमधील अंतर्गत कलह आणि समन्वयाचा अभाव. यामुळेच कोरोनाला रोखण्याचं नियोजन कोलमडलं आणि त्याची जबाबदारी सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी घ्यावी", असं दरेकर यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

हौस ऑफ बांबू : खादाड पत्रकारांचे मेन्यूकार्ड..!

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

SCROLL FOR NEXT