शरद पवारांच्या मार्गदर्शनामुळे पोटात का दुखते? तपासे यांचा फडणवीसांना सवाल 
मुंबई

शरद पवारांच्या मार्गदर्शनामुळे पोटात का दुखते? तपासे यांचा फडणवीसांना सवाल

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार राज्य सरकारला मार्गदर्शन करत असतील, तर पोटात दुखायचे कारण काय? असा थेट सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. 

कर्ज काढणे हे पाप नाही, परंतु राज्याचा जीएसटीचा हक्काचा 28 हजार कोटींचा परतावा राज्याला न देणे हे निश्‍चितच पाप आहे. हक्काचा परतावा राज्याला परत मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रयत्न करणार का? आणि केले का, असा सवाल करतानाच पाप आणि पुण्याची परिभाषा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना समजावू नये, असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला. 

गुजरातमध्ये भूकंप झाला त्या वेळी गुजरात व केंद्रात भाजपचे सरकार होते. तरीसुद्धा भूकंपपीडितांना मदत करू शकले नाहीत. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्या वेळी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शरद पवार यांना केले होते, तो सरकारचा नाकर्तेपणा होता का, असा खोचक सवालही तपासे यांनी केला. देशात अनेक कृषिमंत्री झाले; मात्र एकमेवाद्वितीय कृषिमंत्री शरद पवार राहिले आहेत. ज्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला. यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल, ते महाविकास आघाडी करेल याची आठवणही महेश तपासे यांनी फडणवीस यांना करून दिली आहे. 
----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना मानवंदना

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT