मुंबई

'गेल्या सहा वर्षात भाजप नेत्यांवर ई़डीचे छापे का नाहीत'?; कॉंग्रेसचा सवाल

तुषार सोनवणे

मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी 8ः30 च्या सुमारास छापा टाकला. ईडीने टाकलेल्या छाप्यामागे राजकारण असल्याचा आरोप कॉंग्रेसनेते सचिन सावंत यांनी केला आहे. 

'देशात विरोधकांचे महत्व कमी करण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करीत आहे. गेल्या सहा वर्षात एकाही भाजप नेत्यावर ईडी ने छापा का टाकला नाही. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशा पद्धतीने भाजप वागत आहे.' अशी टीका कॉंग्रेसनेते सचिन सावंत यांनी केली आहे. 

'भाजप हीन भावनेने राजकारण करीत आहे. ज्यांना लोकांनी निवडून दिले त्यांनीच लोकशाहीच्या मुळावर घाव घातला आहे. लोकांनी याचे चिंतन करायला हवे. दरेकरांचा मुंबई बँक घोटाळा, विजय गावितांवर झालेले घोटाळ्याचे आरोप, या लोकांना भाजपने गंगाजल शिंपडून पक्षात प्रवेश दिला का' ? अशीही टीका सावंत यांनी केली आहे.

काय आहे नक्की प्रकरण? 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेत. पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईकांच्या घरीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. यासोबतच त्यांच्या कार्यालयातही ईडीचे अधिकारी पोहोचलेत. दिल्ली आणि मुंबई असे ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचलेत. मात्र कोणत्या प्रकरणात ही धाड मारण्यात आली आहे, त्याबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान प्रताप सरनाईक मुंबईत नसल्याचंही समजतंय. मनी लाँड्रिंगच्या संशयावरून प्रताप सरनाईक यांच्या घरी हे पथक पोहोचले आहे. यावरून महाविकास आघाडी विरूद्ध भाजप आमने सामने उभे आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 1 एप्रिलला बँका सुरू की बंद? बँकेत जाण्याआधी RBI काय सांगते नक्की जाणून घ्या

Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

Anand Mahindra: लोक हसले, पण तो काम करत राहिला! एका मुलाने स्वच्छ केली संपूर्ण नदी, आनंद महिंद्रा यांनीही केले कौतुक

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातचा आयकर विभागालाही गंडा?

SCROLL FOR NEXT