मुंबई

वाकण-पाली-खोपोली मार्गाचे काम पुन्हा ठप्प 

अमित गवळे

पाली : वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची बिले मागील 6 महिन्यांपासून थकीत आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या ठेकेदारांनी बेग कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या गेटसमोर सोमवार (ता. 26) पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. थकीत बिलांचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत उपोषण आणि काम बंद राहणार असल्याचे ठेकेदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पैसे न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष नितीन वाघमारे यांनी दिला आहे. 

हे वाचा : मांडव्यातील मच्छीमारांचे प्रश्न सुटणार

ठेकेदारांनी याअगोदर काही दिवसांपूर्वी थकीत बिलांसाठी आंदोलन करून काम बंद केले होते; तर मागील आठवड्यात बेग कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी 6 महिन्यांचा थकीत पगार मिळण्यासाठी काम बंद करून पाली तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. अशा प्रकारे या मार्गाचे काम विविध कारणांमुळे ठप्प होऊन अपूर्ण राहत आहे. तसेच खराब रस्त्यामुळे वाहनचालक व प्रवासीदेखील हैराण झाले आहेत. 

कंपनीने बिलांची फक्त 25 टक्के रक्कम दिली आहे. पूर्ण रक्कम न दिल्याने ठेकेदारांना बॅंकेकडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही. तसेच इन्कम टॅक्‍स, जीएसटी, कामगारांचे पगार, पीएफ व इतर सरकारी देयके देता येत नाहीत. ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याबरोबरच संबंधित लोक ठेकेदारांकडे वसुलीकरिता वारंवार तगादा लावत असल्यामुळे मानसिक त्रास होत आहे. 
- मनीष खवळे, सचिव, वाकण-पाली-खोपोली ठेकेदार संघटना 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

ऑनलाइन परीक्षा घेण्याची सरकारचीच लायकी नाही! संभाजीनगरमध्ये कोर्टाच्या परीक्षेत गडबड, अभिजित दिपके संतापले

Godavari flood tragedy: गोदावरीच्या पुरात विजेचा धक्का; मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, सावखेडा गावात शोककळा

Marathi News Live Updates : ''गोपीनाथ मुंडे काँग्रेससोबत असते तर...''; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान पुन्हा चर्चेत

MPSC Success : कोकडेवाडीच्या शेतकरी पुत्राचा पराक्रम: संजय शितोळे यांची MPSC दुय्यम निबंधक पदावर निवड

SCROLL FOR NEXT