मुंबई

वर्षा राऊत यांना ED नोटीस, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

सुमित बागुल

मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED मार्फत समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना मिळालेली ही तिसरी नोटीस आहे. पहिल्या दोन नोटिसला प्रतिसाद न मिळाल्याने आता हे बोलावणे पाठवले आहे. मुंबईलगतच्या परिसरातील एका अपक्ष आमदाराशी संबंध असलेल्या राऊतांच्या एका नातलगाने दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीतून काही रक्कम वर्षा राऊत यांच्या पीएमसी बॅंकेतील खात्यात टाकण्यात आली. ईडीला या प्रकरणाची चौकशी करायची आहे. 

काय आहे घटनाक्रम

  • PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती
  • गोरेगाव येथील एका रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती
  • सुरुवातीला प्रकरण हे EOW करत होती, नंतर हे प्रकरण ED कडे गेलं
  • वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आलं
  • प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती
  • प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये गेल्याची माहिती
  • हे पैसे का घेतले गेले याची माहिती ED ला हवी आहे
  • राज्यसभेच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केल्याची माहिती
  • 55 लाख रुपये लोक घेतल्याची माहिती शपथपत्रात
  • या 55 लाखांच्या माहितीसाठी ED ने वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले

wife of sanjay raut varsha raut gets ED notice know full chronology maharashtra politics

wife of sanjay raut varsha raut gets ED notice know full chronology maharashtra politics

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT