will curb wastage of electricity on street mission from Mahavitaran msedcl Sakal
मुंबई

पथदिव्यांवरील विजेच्या उधळपट्टीला चाप लावणार; महावितरणकडून शोध माेहिम

राज्यातील अनेक शहरातील पथदिवे दिवसा ढवळ्या सुरू ठेवले जात असल्याने मोठ्या प्रमाणात विजेची उधळपट्टी होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील अनेक शहरातील पथदिवे दिवसा ढवळ्या सुरू ठेवले जात असल्याने मोठ्या प्रमाणात विजेची उधळपट्टी होत आहे. त्याला चाप लावण्यासाठी दिवसा सुरू राहणाऱ्या पथदिव्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. तसेच पथदिव्यांसाठी स्वतंत्र वीज वहिनी टाकण्याची योजना आहे.

महावितरणकडून राज्याच्या कानाकोपऱ्यात वीज पुरवठा केला जात असून खेडोपाट्यांसह शहरी भागातील पथदिव्यांना महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. त्याचे वीज बिल संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून भरणे आवश्यक आहे.

मात्र सदरचे बिल वेळेत भरले जात नसल्याने थकबाकी वाढत चालली आहे. त्यातच अनेक ठिकाणी पथदिव्यांसाठी स्वतंत्र वीज वाहिन्या नसल्याने ग्राहकांसाठीच्या वीज वाहिनीतून वीज पुरवठा दिला आहे.

ग्राहकांची वीज वहिनी दिवसभर सुरू ठेवावी लागते असल्याने पथदिवेही दिवसाढवळ्या सुरू असतात. तसेच त्याचे वाढीव वीज बिल भरण्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था नकार देतात. त्यामुळे कोणत्या ठिकाणी दिवसभर वीज वाहिन्या सुरू राहतात, कुठे पथदिव्यांसाठी स्वतंत्र वीज वहिनी नाही त्याचा शोध घेण्याचे निर्देश आपल्या विभागीय कार्यालयांना दिले आहेत.

प्रतिमा मलिन होतेय

राज्यात अनेक ठिकाणी ग्राहकांना वीज पुरवठा केल्या जाणाऱ्या वीज वाहिनीवर पथदिवे लावले जातात. त्यामुळे सदर वहिनी चोवीस तास चार्ज ठेवावी लगत असल्याने पथदिवेही दिवसभर नाहक सुरू राहतात.

त्यामुळे विजेचा अपव्यय होत असून महावितरणची प्रतिमा मलिन होत आहे. ती सुधारण्यासाठी आणि विजेचा अपव्यय टाळण्यासाठी ज्या ठिकाणी पथदिव्यांना स्वतंत्र वीज वाहिनी नाही, तेथे टाकण्याची योजना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SBIच्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी UPI सेवा राहणार बंद; आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिला पर्याय

Pune Mobile Recovery : ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तांत्रिक तपासातून २५ गहाळ मोबाईल शोधून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

SCROLL FOR NEXT