4 ऑक्टोबरच्या रात्री वृक्षतोडीविरोधात आरेमध्ये झालेले आंदोलन 
4 ऑक्टोबरच्या रात्री वृक्षतोडीविरोधात आरेमध्ये झालेले आंदोलन  
मुंबई

आरेतील आणखी ७० झाडांवर कुऱ्हाड ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरे वसाहतीची देखभाल करणाऱ्या दुग्धविकास (डेअरी) विभागाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मेट्रो भवन बांधकाम करण्यासाठी नुकतीच परवानगी दिली. परंतु, त्यासाठी आणखी ७० झाडे तोडली जाण्याची शक्‍यता असल्याने पर्यावरणप्रेमींनी या बांधकामाला तीव्र विरोध दर्शवला आहे. 

दरम्यान, मेट्रो भवनाच्या कामामुळे पर्यावरणाची हानी होणार नसल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या आरे वसाहतीच्या परिसरात मुंबई मेट्रोच्या १४ मार्गांचे व्यवस्थापन, नियंत्रण आणि प्रशिक्षण केंद्र असलेल्या मेट्रो भवनची ३२ मजली इमारत बांधली जाणार आहे. १४ मेट्रो मार्गांपैकी वर्सोवा-घाटकोपर मार्गावरील सेवा सुरू असून, उर्वरित १३ मार्गांचे काम प्रगतिपथावर आहे. 

मुंबईत ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे तयार होणार आहे. दुग्धविकास विभागाने ११ ऑक्‍टोबरला एमएमआरडीएला पत्र पाठवून २.०३ हेक्‍टर क्षेत्रावर मेट्रो भवन आणि इतर बांधकामे करण्यासाठी परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. दुग्धव्यवसाय विभागाचे अधिकारी वेळोवेळी बांधकामांचा आढावा घेतील. त्यांना एमएमआरडीएने सहकार्य करावे, असे सांगण्यात आले आहे, अशी माहिती मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

परवानगी दिलेल्या जागेवरच बांधकाम
परवानगी दिलेल्या जागेवरच बांधकाम करावे, सभोवतालच्या नैसर्गिक संपदेला हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी, अनधिकृत बांधकाम करू नये आणि बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती आरे डेअरी विभागाला द्यावी, असे निर्देश दुग्धव्यवसाय विभागाने दिले आहेत. 

आरेतील आंदोलक आज मोकळेपणाने बोलणार! 
मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील झाडे कापण्यात आल्यानंतर पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात आला. आम्ही आंदोलनकर्त्यांच्यासोबत असल्याचे दर्शविण्यासाठी ‘आम्ही आरेचे पाठीराखे’ सामाजिक आणि नागरी संस्थांच्या वतीने गुरुवारी (ता. १७) ‘आरेतील आंदोलक आणि माध्यमकर्मींशी गप्पा’असा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या सभागृहात कार्यक्रम होईल. आरेचे आंदोलक म्हणून प्रमिला भोईर, संदीप परब, शशी सोनावणे, स्टॅलीन दयानंद, पत्रकार अनुजा चवाथे आणि पर्यावरणतज्ज्ञ व भवतालचे संपादक अभिजीत घोरपडे संवाद साधणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT