file photo 
मुंबई

मोकळ्या जागांचे प्रमाण कमी होणार? 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरक्षित भूखंड खासगी मालकांकडून विकत न घेता झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्याची परवानगी आणि हस्तांतर विकास अधिकार (टीडीआर) देण्याचा विचार महापालिका करत आहे. त्यातून सुमारे 15 हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे; परंतु या निर्णयामुळे मुंबईतील मोकळ्या जागांचे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता आहे. 


महालिकेला वर्षभरात सुमारे 76 आरक्षित भूखंड ताब्यात घ्यायचे आहेत. तेथील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी सुमारे 6751 कोटी आणि जमिनीच्या मालकांना मोबदला म्हणून 83,030 कोटी रुपये द्यावे लागतील. हा सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्याऐवजी महापालिका जमिनीच्या मालकांना टीडीआर देणार आहे. त्या भूखंडांवर झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवल्यानंतर महापालिकेला 25 टक्के जागा मिळू शकते, अशा पर्यायाची चाचपणी सुरू आहे. 

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या महापालिकेसाठी हा निर्णय योग्य वाटत असला, तरी त्यामुळे मुंबईतील मोकळ्या जागांचे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता आहे. कुर्ला येथील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेला 1450 चौरस मीटरचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला 43 कोटी मोजावे लागतील. त्या भूखंडावर झोपु योजना राबवल्यास महापालिकेला 25 ते 30 टक्के खर्च येईल; मात्र त्यातून फक्त 25 टक्के जागा खेळाच्या मैदानासाठी मिळेल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT