fadnvis 
मुंबई

राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करणार, जनतेनंही करावं - फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात पुन्हा करोनाचा थैमान आपल्याला पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून ज्या उपाययोजना केल्या जातील त्याला सर्वांनीच सहकार्य करणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्य सरकारला आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत, अशी माहिती विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

फडणवीस म्हणाले, "राज्याच्या कॅबिनेटने नुकतेच काही निर्णय घेतले आहेत. या बैठकीनंतर काही मंत्र्यांनी राज्यात वीकेंड लॉकडाउन आणि इतर दिवशी अशतः लाॉकडाउन जाहीर केल्याचं कळतंय. त्यामुळे लोकांना विनंती आहे की त्यांनी सरकारच्या या निर्णयाला सहकार्य करावं तसेच आम्हीही सरकारला याबाबत सहकार्य करणार आहोत. आम्ही भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन केलंय की त्यांनी राज्यात लसीकरण मोहिमेसाठी मदत करावी.
 
नव्या स्ट्रेनबाबत जनजागृती व्हावी

केवळ लॉकडाउन करुन भागणार नाही. नवीन स्ट्रेन इतक्या वेगानं का पसरतोय? महाराष्ट्रातचं तो का वाढतोय? याचा शोध घेतला पहिजे. आम्ही काही तज्ज्ञ डॉक्टरांशी याबाबत चर्चा केली त्यांनी सांगितलंय की कोरोनाचे नवीन स्ट्रेन खूपच लवकर परिणाम करत आहेत. याचा संसर्ग होताना सुरुवातीला काही लक्षणं दिसत नाहीत मात्र नंतर ते वाढतात. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून जनतेचं प्रबोधन होताना दिसत नाही. याबाबतही जनजागृती झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

इतर शहरांमधील आरोग्य सेवेकडे लक्ष द्या

मुंबई-पुणे ही राज्यातील महत्वाची शहरं आहेत या शहरांची काळजी घेतलीच पाहिजे. पण राज्यात इतरही शहरे आहेत. या शहरांमधील आरोग्य सेवा महापालिकांच्या अखत्यारित नाहीत तर राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे आत्ताच्या कोरोनाच्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी त्या सक्षम करायला हव्यात. सध्या दवाखान्यांमध्ये व्हेंटिलेटर्स, बेड्स नाहीत. त्यामुळे सरकारने याचा पुरवठा कसा वाढवता येईल याचा विचार करायला हवा. तसेच पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणं ट्रॅकिंग, ट्रेसिंगकडे लक्ष द्यायला हवंय,  असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

वीज तोडणीचा तुघलकी निर्णय मागे घ्यावा

फडणवीस म्हणाले, राज्य सरकारनं थकलेली वीज बिल गोळा करण्याठी वीज तोडणी मोहिम राबवली. यातून राज्याला मोठा महसूल मिळाला आहे. त्यामुळे राज्य शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी आता वीज तोडणीचा हा तुघलकी निर्णय मागे घ्यावा.

गरीब, मध्यम वर्गीयांसाठी पॅकेज जाहीर करावं 

सध्याच्या परिस्थितीत समाजातील गरीब, छोट्या मध्यमवर्गासाठी सरकारने मदतीची घोषणा केली पाहिजे, त्यांना पॅकेजेस दिली पाहिजेत. राज्यानं यावरही चर्चा करावी केवळ लॉकडाउनवर चर्चा नको, अशी भूमिकाही यावेळी फडणवीस यांनी मांडली.

आपली कार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्रावर टीका

शिवसेना नेते संजय राऊत आणि त्यांच्यासारखे इतर नेते उठसूठ केंद्र सरकारवर टीका करत असतात. मुळात राज्यातील आपल्या सरकारची कार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारवर टीका करतात. पण उटसूट प्रत्येकानं केंद्राकडं बोट दाखवायचं हे चालणार नाही. जनता हे चालू देणार नाही, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका, आता एसटीचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले संकेत...

Kolhapur Ministers Convoy Stopped : कोल्हापुरातील मंत्र्यांचे दिशादर्शक पाऊल; मुश्रीफ, आबिटकर, क्षीरसागरांनी वाहनांचा ताफा नाकारला, आमदार, खासदार बंद करणार का?

Chhatrapati Sambhaji Maharaj Procession : छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणूकीला पोलिसांनी परवानगी नाकारली, शिव-शंभू समर्थक आक्रमक, गारगोटीत तणाव

मोठी बातमी! मॉर्टगेज लोनसाठी शेतकऱ्यांना बॅंकांचे दरवाजे बंद; थकबाकी वाढल्याने बॅंकांनी आखडला हात; केवळ पीक कर्जवाटपालाच प्राधान्य, वाचा...

Panchang 15 May 2026 : आजचे पंचांग! शनि जयंती, अमावस्या आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT