मुंबई

Shrikant Shinde: कल्याण लोकसभेत राष्ट्रवादीला भविष्यात ताकद देण्याची खासदार शिंदे यांची ग्वाही

राष्ट्रवादी मेळाव्यात खासदार शिंदे यांची राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना उभारी

शर्मिला वाळुंज

Dombivali News: मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप शिवसेनेसोबत नव्हती. परंतु आता आपली महायुती आहे. त्यामुळे यावेळी मताधिक्याचा आकडा देखील तेवढाच राहिला पाहिजे. लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत ही महायुती अशीच टिकली पाहिजे. तुम्ही सगळे निश्चिंत रहा. कल्याण लोकसभेत आमच्याकडून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद दिली जाईल अशी ग्वाही

देतो असे सांगत शिवसेना खासदार डॉ. शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी डोंबिवलीत पार पडला. महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधत निवडणुकीच्या कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केले आहे. यावेळी आमदार किसन कथोरे, प्रमोद हिंदुराव, जगन्नाथ शिंदे, गोपाळ लांडगे, राजेश मोरे, शशिकांत कांबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

खासदार शिंदे पुढे बोलताना म्हणाले, कल्याण लोकसभेची जागा रेकॉर्ड मताने जिंकायची आहे. या अगोदर भाजप आणि शिवसेना यांच्याकडून 2019 मध्ये मी लढलो होतो. तेव्हा राष्ट्रवादी बरोबर नव्हती पण तेव्हा देखील राष्ट्रवादीला 2 लाख 15 हजार मते पडली होती. तर मला 5 लाख 59 हजार मतं मिळाली होती. यांचं कॅल्क्युलेशन आता केल तर मला वाटतं साडेसात लाखापेक्षा जास्त मतं आपल्याला पडली पाहिजे. पण यावर आपल्याला थांबायचं नाही.

पहिल्या बैठका जेव्हा झाल्या तेव्हा आप्पांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कल्याण लोकसभेमध्ये निधी आणला पण आमच्याही कार्यकर्त्यांना निधी मिळाला पाहिजे असे निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी 20 कोटीच्या निधीची मागणी कार्यकर्त्यांसाठी केली होती.

मी क्षणाचा ही विलंब न लावता त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांची सही घेऊन दुसऱ्याच दिवशी मी तो निधी त्यांना दिला होता. हे काम आपल्या सरकारचे आहे. म्हणून आपण देखील विश्वास ठेवा, आपण या महायुतीमध्ये सामील झालेले आहात. जसे भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे, त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही करतो. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतील. कारण ही सुरुवात आहे. हे लोकसभे पुरते मर्यादित नाही.

लोकसभा, विधानसभा किंवा महापालिका असेल ही महायुती पुढेही अशीच चालू राहिली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. जेणेकरून या जिल्ह्यामध्ये आपली ताकद दिसली पाहिजे. आपण तिघे एकत्र आहोत तर आपल्या समोर याठिकाणी कोणीही तग धरू शकत नाही असे म्हणत खासदार शिंदे यांनी महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल व विरोधक महायुती समोर तग धरू शकणार नाही असे म्हणत ठाकरे गटाला टोला लगावला.

श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरे यांना सल्ला

ज्याची जी कुवत आहे त्याप्रमाणे त्यांनी वक्तव्य केले पाहिजे....आपल्या कुवती पेक्षा जास्त वक्तव्य झेपत नसेल तर करू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच जणांचे बळी घेतले तर ज्यांनी साथ दिली त्याचाच घात केला कल्याण लोकसभेची जागा देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करावी लागली अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT