मुंबई

अंतिम वर्षाच्या सराव प्रश्नपत्रिका मिळणार; परीक्षा अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांचा वाढीव कालावधी

तेजस वाघमारे

मुंबई : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, परीक्षा अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून विद्यापीठाने 18 ते 20 सप्टेंबरपर्यंत वाढीव कालावधी दिलेला आहे. या वाढीव कालावधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी  विद्यापीठांना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. गुरुवारी (ता.17)  मुंबई विद्यापीठात परिक्षेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटता कामा नये, त्यासाठी विद्यापीठ विशेष प्रयत्न करत आहे. यामध्ये विद्यापीठाकडून सर्व शक्यतांचा अभ्यास करून नियोजन करण्यात आलेले आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 2 लाख  47 हजार  500 आहे. यामध्ये नियमित परीक्षा देणारे 1 लाख  70 हजार विद्यार्थी असून उर्वरित 72 हजार 500 विद्यार्थी बॅकलॉगचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत कोणतेही संभ्रम करून घेऊ नयेत. विद्यापीठाकडून परीक्षेसंदर्भात वेळोवेळी अधिकृत सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे सामंत म्हणाले.

25 सप्टेंबरपासून बॅकलॉगच्या परीक्षा
मुंबई विद्यापीठाने आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा 15 सप्टेंबरपासून सुरू केल्या आहेत. तर 25 सप्टेंबरपासून बॅकलॉगच्या परीक्षा सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात होणार आहेत. यामध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणे शक्य नसेल, अशा विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीद्वारे परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठामार्फत केलेले आहे. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही सामंत यांनी सांगितले. या बैठकीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

Why Gold Prices Falling During War : गुंतवणूकदार चक्रावले! सोन्यात 22 हजार तर चांदीत 58 हजारांची विक्रमी घसरण; खरेदीसाठी हीच योग्य वेळ?

YEIDA: एअरपोर्ट शेजारी स्वतःचं घर घेण्याची सुवर्णसंधी! नवी प्लॉट स्कीम लाँच; पाहा किती आहे किंमत आणि कसा करायचा अर्ज

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! RBIच्या मोठ्या निर्णयाआधी उलटफेर; जाणून घ्या आजचा ताजा भाव

९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेलं प्रकरण काय होतं? कोर्टाने का म्हटलं ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’?

SCROLL FOR NEXT