मुंबई

BLOG: ठाकरे सरकार 'बंदबुद्धी'तून बाहेर पडणार?

दीनानाथ परब

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर सर्फींग करत असताना, 'बंदबुद्धी' हा शब्द माझ्या वाचनात आला. खरंतर एखाद्या घटनेकडे, वक्तव्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा जसा वेग वेगळा दृष्टीकोन असतो. तसंच 'बंदबुद्धी' या शब्दाचाही प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार वेगळा अर्थ काढू शकतो. मी 'बंदबुद्धी' या शब्दाला लॉकडाउनशी (lockdown) जोडलं आहे. कारण लॉकडाउन म्हणजे सगळच बंद. हा निर्णय घेण्यासाठी बुद्धीचा वापर केला जातो. त्या अर्थाने मी लॉकडाउनला 'बंदबुद्धी' या शब्दाशी जोडलं आहे. (Will thackeray govt lift all lockdown & move forward)

सर्वसामान्य लॉकडाउनच्या पुढे जायला तयार पण...

मागच्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून लॉकडाउन हा शब्द महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या पाचवीला पुजला आहे. अजूनही लॉकडाउन पाठ सोडायला तयार नाहीय. आज प्रत्येकालाच लॉकडाउन या शब्दामधुन मुक्ती हवी आहे. कारण कोरोना आणि त्याला जोडून आलेल्या लॉकडाउनने प्रचंड नुकसान केलं आहे. सर्वसामान्यांमध्ये आज कोरोना आणि लॉकडाउनला मागे सोडून, पुढे जाण्याची मानसिक कणखरता निर्माण झाली आहे. कारण त्यांच्यासमोर उद्याच्या रोजी-रोटीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेते मात्र या 'लॉकडाउन'ला सोडायला तयार नाहीयत. कारण त्यांचं अपयश, हतबलता प्रखरपणे अधोरेखित होईल. लॉकडाउन का कायम ठेवायचाय? तर आम्हाला लोकांच्या जीवाची काळजी आहे असं कारण प्रत्येकवेळी त्यांच्याकडून पुढे केलं जातं. खरंच असं सगळं बंद ठेऊन लोकांचे जीव वाचवता येतील का? कोरोना व्हायरस या नेत्यांना कळलाय का?. उलट अतिरेकी लॉकडाउनमुळे बेरोजगारी वाढले, लोकांच्या नोकऱ्या जातीलच. पण त्यामुळे लोकांच्या कौटुंबिक आयुष्यात त्याचे किती गंभीर पडसाद उमटतील, सामाजिक आरोग्याला आपण किती धोक्यात घालतोय, याची लॉकडाउनचं समर्थन करणाऱ्या नेत्यांना कल्पना तरी आहे का?.

तुम्हाला झेपत नाहीय म्हणून तुम्ही....

मागच्या आठवड्याभरापासून टीव्हीवर महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांचे बाईट पाहतोय. आदित्य ठाकरेंचं कालचच विधान आहे, लॉकडाउनबद्दल आताच काही सांगू शकत नाही? दुसरे मंत्री अस्लम शेख म्हणतात की, राज्यात ५० टक्के लसीकरण झालं, तरच लॉकडाउन उठवला जाऊ शकतो. या विधानांचा सर्वसामान्यांनी काय अर्थ काढायचा. संपूर्ण लॉकडाउनचा तुम्ही निर्णय घेतला, तेव्हा तुम्हाला या बद्दल माहित नव्हतं का? लॉकडाउन का लावला जातो?, तर साखळी तोडण्यासाठी आणि मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर उभ करण्यासाठी. लॉकडाउन लावून आता ५० पेक्षा जास्त दिवस झाले, या काळात तिसऱ्या लाटेसाठी मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर उभ राहिलं नाही का? आणि ५० दिवसात तुम्ही कोरोनाची साखळी तोडू शकला नाहीत, तर पुढच्या ५० वर्षात तुम्हाला शक्य होणार आहे का? कारण मुळातच जो व्हायरस गुणाकाराने वाढत जाणार, तो तुम्ही कसा रोखू शकता?. मागच्यावर्षी तुम्ही अनियंत्रित लॉकडाउन लावून ठेवला, त्यावेळी तुमच्याकडे औषध नव्हतं. मग आता लस असतानाही अशी स्थिती का?. तुम्हाला झेपत नाहीय, म्हणून तुम्ही महाराष्ट्राला पुन्हा एकदा अनियंत्रित लॉकडाउनकडे घेऊन जाताय. ज्यामध्ये राज्याचं प्रचंड आर्थिक नुकसान आहे.

बंदबुद्धीने एक प्रश्न सुटेल, १० नवीन निर्माण होतील

कारण ५० दिवसाच्या टाळेबंदीनंतर तुमचे मंत्री लॉकडाउनबद्दल अशी नकारात्मक विधानं करत असतील, तर ते अधिक गोंधळ, गुंता वाढवणार आहे. हॉटेलचालक, व्यापारी, सलून चालक आज अक्षरक्ष: मेटाकुटीला आले आहेत. तुम्ही पहिल्या १५ दिवसांसाठी फक्त १५०० रुपयाची मदत जाहीर केली. त्यानंतर पुढच्या ३० दिवसांचं काय?. लॉकडाउन उठवल्यानंतर रुग्णसंख्या वाढली की, उठसूठ मुंबई लोकलला जबाबदार धरायचं. मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु झाली, तो पर्यंत गर्दीत, चेंगराचेंगरीतून लोक बस प्रवास करायचे. तेव्हा कोरोना कुठे होता? फक्त कोरोना वाढीला लोकलच कशी जबाबदार? असे अनेक मुद्दे आहेत, ज्याला तर्काचा आधारच नाहीय. मुंबईचा डबलिंग रेट जर ३०० दिवसांच्या पुढे आहे, तर बऱ्याचशा गोष्टी सुरु करायला काय हरकत आहे. कारण मागच्यावर्षी लॉकडाउन हटवताना लस नव्हती, आज ती आपल्याकडे आहे. मग धाडसाने पाऊल पुढे टाकायला नको का? कारण बंदबुद्धीने एक प्रश्न सुटेल पण अजून १० नवीन समस्या निर्माण होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT