Mumbai Sakal
मुंबई

कोट्यावधीच्या घोटाळ्यातील हजाराचा दंडही कमी होणार ?

सऱ्या बाजूला नागरी कार्यकर्त्यांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रभागातील विकासकामांच्या 100 कोटी (Cr) रुपयांच्या ऑनलाईन (Online) घोटाळ्यात दोषी आढळलेल्या अभियंत्यांना काही हजारांचा दंड करण्यात येणार आहे. मात्र,आता हा हजारांचा दंडही (Fine) शिथील होण्याचे संकेत मिळत आहे.दुसऱ्या बाजूला नागरी कार्यकर्त्यांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

2018 मध्ये महानगर पालिकेच्या प्रभागातील विकासकामांसाठी ऑनलाइन निवीदा प्रक्रियेत घोटाळा उघड झाला होता.यात,63 अभियंते अधिकारी दोषी आढळले होते.त्यातील 12 अभियंत्यांवर "कठोर' कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.त्यानुसार तीन अभियंत्यांच्या निवृत्ती वेतनातून एकदा दिड ते साडे तीन हजार कापण्यात येणार आहे.तर,उर्वरीत 9 अभियंत्यांच्या निवृत्ती वेतनातून कायमस्वरुपी दिड ते चार हजार रुपये कापण्यात येणार आहे.तसा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता.

स्थायी समितीने हा प्रस्ताव राखून ठेवला आहे.दोषी अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवताना कोणते निकष लावण्यात आले.याबाबची स्पष्टता प्रस्तावात नाही.सरसकट निकष लावल्यास अभियंत्यांवर अन्याय होऊ शकतो.असा मुद्दा चर्चेच्या वेळी उपस्थीत झाला."या कारवाईचा आणि दोषारोपांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे.त्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT