मुंबई

सरकारचा चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा थेट आरोप

पूजा विचारे

मुंबईः  कोरोनाचं संकट पाहता यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. येत्या १४ आणि १५ डिसेंबरला हे अधिवेशन घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. मात्र या अधिवेशनावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या या निर्णयाला भाजपनं विरोध केला आहे. केवळ २ दिवसांचं अधिवेशन घेणं म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होईल. येत्या 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. पण विरोधीपक्षानं दोन आठवड्याची मागणी केली होती.  त्यामुळे सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी आरोप केलेत. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

हिवाळी अधिवेशन दोन दिवसांचं होणार आहे. आमचा आग्रह होता की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, शेतकरी अडचणीत आहेत, कापूस, सोयाबीनचं मोठ नुकसान झालंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ओबीसींमध्ये भीतीचं वातावरण आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला खडे बोल सुनावले जाताहेत. विधानभवन हे महत्त्वाचं स्थान असताना दोन दिवसांचा अधिवेशन म्हणजे पळ काढणे एवढाच विषय असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

दुसरीकडे मराठा आरक्षणचा मुद्दा, ओबीसी समाजाची मागणी, राज्यात महिलांवर वाढते अत्याचार, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला मिळालेली चपराक, अशा सर्व विषयांवर चर्चा व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी किमान दोन आठवड्याचं अधिवेशन घ्या, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती. पण सरकारकडून ती मान्य करण्यात आली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  
 
दरम्यान, पहिला दिवस शोक प्रस्ताव ठेवला जाईल. त्यानंतर पुरवणी मागण्या मांडणे, दुसऱ्या दिवशी मागण्या मंजूर करणे असं कामकाज असेल, अशी माहिती परब यांनी दिली आहे.

Winter session issue Devendra Fadnavis criticizes Thackeray government

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT