Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray 
मुंबई

कृती न करता भेटून काहीही फायदा होणार नाही - देवेंद्र फडणवीस

सत्तेत नसलो तरी आमची मैत्री कायम आहे हे सकारात्मक वक्तव्य आहे.

दीनानाथ परब

मुंबई: "महाराष्ट्र सरकारने केंद्रासोबत संवाद सुरु केला याचा आनंद आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय आहे. ते देशातल्या कुठल्याही राज्यात रद्द झालेलं नाही. ते केवळ महाराष्ट्रात रद्द झालं आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) सांगितलेली कृती वेळेत न केल्यामुळे ओबीसी आरक्षण केवळ महाराष्ट्रात रद्द झालं आहे. आता सर्वोच्च न्यायालायने सांगितलेली कृती केली तर ओबीसीचं आरक्षण बहाल होऊ शकतं. यात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नाही" असे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज पंतप्रधानांची भेट घेतली. (Without action if you are meeting there is no benefit devendra fadnavis on uddhav thackeray delhi visit )

"मराठा आरक्षणाबाबत या सरकारने जी समिती तयारी केली होती. त्या रिपोर्ट्मध्ये रिवीजन याचिका दाखल करा असं म्हटलं आहे. रिवीजन पीटीशन मंजूर होत नसेल, तर पुन्हा कृती करावी लागेल. राज्य मागास वर्ग आयोग तयार करुन तो अहवाल केंद्रीय मागास वर्ग आयोगाकडे पाठवावा लागेल. राज्याने कृती केल्यानंतर केंद्र कृती करु शकेल. कृती न करता भेटून काहीही फायदा होणार नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

"मेट्रो तात्काळ झाली पाहिजे असं आमचं मत आहे. यामध्ये केंद्र सरकार थर्ड पार्टी आहे. यातून मार्ग निघाला पाहिजे. केंद्राने मागच्यावर्षीचा जीएसटीचा परतावा दिलाय आणि यावर्षीचा सुद्धा परतावा देणं सुरु आहे" असे फडणवीस यांनी सांगितलं.

"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही चांगली मागणी आहे. आमची देखील ती मागणी आहे. शेवटची मागणी विचित्र वाटते. त्याचा पंतप्रधानांशी काही संबंध येत नाही. राज्यपाल नियुक्त बारा सदस्य राज्यपाल ठरवतात. त्याचा पंतप्रधानाशी संबंध नाही. भेटीकडे सकारात्मकतेने पाहूया. केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी संवाद ठेवला तर फायदा होईल" असे फडणवीस म्हणाले.

"शिष्टमंडळाच्या बैठकीतनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची व्यक्तीगत बैठक झाली. अशी बैठक होत असते, त्याचा राज्याला फायदा होईल. सत्तेत नसलो तरी आमची मैत्री कायम आहे हे सकारात्मक वक्तव्य आहे. राजकीय दृष्टया आम्ही वेगळे झालो आहोत, तो संघर्ष चालू राहिलं. पण व्यक्तीगत संबंध चांगले असले पाहिजेत" असे फडणवीस म्हणाले. शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? या प्रश्नावर फडणवीस यांनी, राजकारणात जर-तरला अर्थ नाही. ते सत्तेत आहोत आम्ही विरोधी पक्षात आहोत" असे उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT