मुंबई

मुंबईकर विनामास्क फिरू नका, दरदिवशी होतेय हजारो रुपयांची दंड वसुली

कुलदिप घायवट

मुंबई:  कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याने राज्य सरकारकडून खबरदारीचे पावले उचलली जात आहेत. राज्य सरकारने अनेक विभागात कडक लॉकडाऊन, जमाव बंदी, कोरोनाचे नियम कडक केले आहेत. मात्र या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे केले जात आहे. रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मात्र, प्रवासी या नियमांचे पालन करत नाही. अशा प्रवाशांना पकडून त्यांच्यावर दंडक कारवाई केली जात आहे. त्यामुळे मार्च महिन्यात दरदिवशी ४० हजारांहून अधिक दंड वसुली केली जात आहे.

राज्य सरकार, रेल्वे प्रशासन, महापालिका प्रशासनाद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर नियमावली तयार केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी मास्क वापरणे, गर्दीचे नियोजन करणे, या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी क्लिनिक मार्शल पथकाची नियुक्ती केली आहे. विनामास्क किंवा व्यवस्थित मास्क न घातलेल्या प्रवाशांना पकडल्यास साधारण 200 रुपये दंड आकारला जात आहे. मात्र, तरीही प्रवाशांकडून विना मास्क प्रवास होत आहे. या प्रवाशांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यास अरेरावीची उत्तरे दिली जातात. याचे रूपांतर भांडणांमध्ये होत असल्याचे दिसून येते.

पश्चिम रेल्वे मार्गावर 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत एकूण 4 हजार 017 प्रवाशांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 6 लाख 29 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, 1 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत एकूण 5 हजार 530 प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून तब्बल 8 लाख 83 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

मार्च महिन्यातील कारवाई आणि दंड वसुली

तारीख कारवाई दंड
     
1 मार्च 271 41700
2 मार्च 245 43500
3 मार्च 167 27100
4 मार्च 301 51800
5 मार्च 259 43200
6 मार्च 270 46200

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Without mask More than 40 thousand fines collect each day March

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT